शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुसंस्कृतपणाची पुरुषकेंद्री व्याख्या बदलावी

By admin | Updated: August 4, 2015 00:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातर्फे स्त्रियांच्या प्रश्नांवर शनिवारी गटचर्चा संपन्न झाली.

विविध विषयांवर गटचर्चा : विद्यापीठात स्त्रियांच्या प्रश्नांवर ऊहापोह अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातर्फे स्त्रियांच्या प्रश्नांवर शनिवारी गटचर्चा संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक वैशाली गुडधे (चौखंडे), प्रमुख अतिथी म्हणून मीनाक्षी वानखेडे यासह केंद्रातील भगवान पांडुरंग फाळके उपस्थित होते.भारतीय समाजातील स्त्रियांचे अदृश्य अस्तित्व अधोरेखित होऊन त्यांचे अलक्षित प्रश्न ठळक रुपात पुढे यावे, यादृष्टीने स्त्री अभ्यास केंद्रांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतून हा एक कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. पाच विषयांवर आधारित या गटचर्चेत अनुक्रमे सुसंस्कृत स्त्री : समज-गैरसमज, पुरुषपणाची लक्षणे, जोडीदाराविषयीची संकल्पना, बेरोजगारिता आणि स्त्रिया, संपत्तीवरील स्त्रियांचा अधिकार हे विषय चर्चेला घेण्यात आले. साधारणत: स्त्रीच्या सुसंस्कृतपणाविषयी समाजात विविध प्रकारच्या धारणा आहेत. या धारणांनी बदलत्या काळात स्त्रियांसह एकूण समाजासमोर अनेकविध प्रश्न निर्माण केले आहेत. वर्तमान काळात स्त्रीसाठी सुसंस्कृतपणाची असणारी पुरुषकेंद्री व्याख्या बदलावी लागेल, असा सूर चर्चेमधून व्यक्त करण्यात आला. ‘पुरुषपणाची लक्षणे’ या विषयावरील चर्चेत समाजामध्ये व्यक्तीची होणारी घडण हीच मुळात विषमतेच्या तत्त्वावर होत असते. त्यानुसार पुरुष आणि स्त्रीत्वाची चौकट व्यक्तीला प्रदान करण्यात येते. ही व्यवस्था पुरुषांना विशेषाधिकार देऊन स्त्रीला दास्यत्व देते. म्हणून या चौकटीला छेद देऊन नव्या जगात प्रवेश करीत असताना लिंगसमभाव आपल्या जीवनात उतरावावा लागेल, असे विचार समोर आले आहे.‘जोडीदाराविषयीची संकल्पना’ या विषयावर चर्चा करीत असताना, जात, धर्म आणि वर्ग आणि घरंदाजपणाची चौकट यामुळे स्त्रियांबाबत जोडीदार निवडताना अनेक अनेच्छिक प्रकार घडतात. आॅनर किलिंग, घटस्फोट, हुंडाबळी यासह इतर प्रकारची स्त्रियांबाबत घडणारी हिंसा याकरिता जोडीदाराविषयीच्या संकल्पनेतील अस्पष्टताच मुख्य कारण असल्याचे दिसून येते.म्हणून जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य व्यक्तीला अत्यावश्यक असल्याचे मत चर्चेअंती व्यक्त करण्यात आले. ‘बेरोजगारिता आणि स्त्रिया’ या विषयावर चर्चा करणाऱ्या गटाने बेरोजगार म्हणून स्त्रीचा उल्लेख बौद्धिक क्षेत्रापासून तर सर्वसामान्य जीवनापर्यंत कुठेच होत नाही. कारण पुरुषकेंद्री समाजात रोजगार हा पुरूषांच्या मक्तेदारीचा भाग समजला जातो, ही महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते. संचालन मनीषा इंगळकर यांनी तर प्रास्ताविक भगवान फाळके आणि आभार प्रदर्शन वैभव अर्मळ यांनी केले. (प्रतिनिधी)