शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चांदूरबाजार आगाराची भंगार गाडी झाडावर आदळली

By admin | Updated: September 4, 2014 23:26 IST

स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली.

चालक-वाहकासह ३० जखमी : १० गंभीर, शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिकचांदूरबाजार : स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली. यात शालेय विद्यार्थ्यांसह ३० प्रवाशी जखमी झाले. त्यात १० प्रवाशांची प्रकृती गंभीर जखमी झाले. ही घटना १०.३० वाजता घडली. जखमींना अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात गाडीचे स्टेअरींग अचानक एकीकडे वळल्यामुळे व त्याच वेळी ब्रेक फेल झाल्यामुळे घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. चांदूर बाजार आगाराची बस क्रमांक एम.एच. ४० ९८९२ ही बस सकाळी १० वाजता घाटलाडकी ला गेली. तेथून शाळेय विद्यार्थ्यांना घेऊन सुरळी मार्गे चांदूर बाजारला येण्यास निघाली होती. दरम्यान सुरळी फाट्या समोर सुमारे १ कि.मी. अंतरावर गाडीचे स्टेअरींग एकीकडे वळू लागल्याचे चालकाच्या लक्षात आहे. त्याने वाहनाचे ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी शेजारच्या शेताच्या धुऱ्यावर असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली. ही धडक इतकी भयानक होती की गाडीचा समोरचया भाग कॅबीनसह झाडात घुसला. यात बसच्या आतील सर्व बैठका तुटल्या. तसेच ५० ते ५५ प्रवाशी अक्षरशा: एकमेकांवर आदळले तर काही बसमधील लोखंडी पत्र्याचा मार लागल्याने जखमी झाले. सुदैवाने यात गाडीच्या केबीनमध्ये प्रवाशी व विद्यार्थी बसलेले नव्हते. अन्यथा या अपघात केबीनमधील एकही प्रवाशी जिवंत नसता अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.यासर्व जखमींना आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी व चांदूर बाजारच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे जखमींना रुग्णालयात आणण्यासाठी एसटी प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळाले नाही. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना घडली तेव्हा चांदूर बाजारचे आगार व्यवस्थापक आगारात उपस्थित नव्हते. त्यांनीसुद्धा जखमींना भेटण्याची तसदी घेतली नाही. या घटनेने एसटीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.