अनेक बँकांचे एटीएम बंदच : व्यवहार अजूनही पटरीवर आलेच नाहीसंदीप मानकर अमरावतीचलनातून पाचशे-हजारांच्या नोटा बाद केल्यानंतर बँकेतून जून्या नोटा बदलण्याची संधी मागील वर्षीतच ३० डिसेंबरला शेवटची संपली. आता २०१७ या नवीन वर्षीला प्रारंभ झाला. परंतु शहरातील बाजारपेठेत चलनकल्लोळ अद्याप कायम आहे. ग्राहक व व्यापाऱ्यांना किरकोळ व्यवहार करताना सुटे पैशांची अडचण निर्माण होत आहे. शहरातील अनेक व्यवसायिकांनी कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून स्वॅपमशीन लावली नाही. त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी केली की, नागरिकांना कॅश स्वरुपात पैसे द्यावे लागत आहेत. नोटांच्या तुटवड्यामुळे माहिनाभरात मोठे व्यवहार बाजारेपेठेत झालेच नाही. नागरिक फक्त जीवनावश्क वस्तू खरेदी करण्यांवर भर देत आहे. त्यामुळे मार्केटमधील व्यवहार अद्यापही पटरीवर आल्याचे दिसून आले नाही. नामांकीत कंपनीच्या ब्रँडेड कपडे, इतर वस्तूंच्या विक्रीसाठी शहरातील शोरुममध्ये सेल लागले आहे. शासनाने आता एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली असून ती अडीच हजारांवरुन साडेचार हजार रुपये करण्यात आली आहे. आता दिवसाला साडेचार हजार रुपये काढता येणार आहे. परंतु अनेक ठिकाणी एटीएममधून अद्यापही पाचशे रुपयांची नवीन चलन मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बँकेतही मोठ्या प्रमाणात विथ्ड्रॉल झाल्यानंतर दोन हजाराच्याच नोटा देण्यात येत आहे. पाचशे रुपयांची चलन बँकेतून बाहेर पडली असत, पाचशे रुपयांच्या नोटा बँकेतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या तर लहान व्यवहार करतांना चलन टंचाई निर्माण झाली नसती. पण असे अद्यापही होताना दिसून येत नाही. ग्राहक व्यापाऱ्यांना दोन हजारांची नोट देत आहेत. पण त्यांनी दोनशे ते तीनशे रुपयांची खरेदी केली तर व्यापारी ग्राहकाला सुटे पैेसे वापस देण्यास टाळाटाळ करीत आहेत. नाहीतर आधीच ग्राहकांना सुटे पैसे देण्याच्या सूचना देण्यात येतात. नाहीतर त्याला वस्तू देण्यात येत नाही. दीड महिन्यानंतरही परिस्थिीती पुर्ववत झालेली दिसून येत नाही. त्यामुळे आणखीन किती दिवस हे चलनकल्लोळ चालणार, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अद्यापही शहरातील अनेक बँकांच्या एटीएममशीन बंदच असल्याने नागरिकांना एसबीआयच्या एटीएमवरच धाव घ्यावी लागत आहेत. एसबीआयच्या एटीएमवर पाचशेच्या नोटा उपलब्ध आहेत. मात्र अनेक एटीएममशीन मध्ये पाचशेच्या नोटा नसल्याची माहिती आहे. अनेक एटीएममध्ये पाचशेच्या नवीन नोटा उपलब्ध नाहीत. पैसे काढण्यासाठी गेलो असता, दोन हजारांचीच नोट निघाली. - स्वप्निल बारब्दे, नागरिक
‘चलनकल्लोळ’ कायमच !
By admin | Updated: January 8, 2017 00:17 IST