शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका, पंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चे आव्हान; थ्री-स्टार मानांकनही हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:28 IST

- प्रदीप भाकरे अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘ओडीएफ  प्लस’ (हागणदरी मुक्त शहर) ...

- प्रदीप भाकरे

अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘ओडीएफ  प्लस’ (हागणदरी मुक्त शहर) दर्जा मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोबतच कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये किमान थ्री-स्टार मानांकन मिळविण्याचे आव्हान या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर असेल.राज्याचा नागरी भाग १ ऑक्टोबर २०१७ रोजी ओपन डेफिकेशन फ्री अर्थात हागणदरीमुक्त घोषित करण्यात आला. शहरांच्या या दर्जात सातत्य राहावे, शहरातील कुटुंबांना शौचालयाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आता या सर्व शहरांना ‘ओडीएफ  प्लस’ व ‘ओडीएफ डबल प्लस’ हा दर्जा प्राप्त करावयाचा आहे. त्याअनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाचा कालावधी हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत असल्याने या कालावधीत सर्व नागरी स्थानिक संस्थांना केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणा-या तपासणीत किमान ओडीएफ प्लस दर्जा मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.... तर सीआर बिघडणारओडीएफ प्लस हा दर्जा व थ्री स्टार मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांवर देण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नाहीत, त्यांच्या आयुक्त व मुख्याधिका-यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात (एसीआर) प्रतिकूल शेरे नोंदविण्यात येणार आहेत. 

जिल्हाधिका-यांनी करावे मार्गदर्शनजिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पालक म्हणून जिल्हाधिका-यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, मार्गदर्शन करावे तथा जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती ते उद्दिष्ट विहित कालमर्यादेत पूर्ण करतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

जानेवारी २०१९ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ओडीएफ प्लस व ओडीएफ डबल प्लसच्या तपासणीत राज्यातील ३८४ शहरांपैकी केवळ नऊ शहरांना ओडीएफ डबल प्लस व १४२ शहरांना ओडीएफ प्लस दर्जा मिळविता आला. त्या अनुषंगाने सर्व नागरी स्वराज्य स्थानिक संस्थांना २ ऑक्टोबरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- जयंत दांडेगावकर, मिशन संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र