शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान!

By प्रदीप भाकरे | Updated: August 14, 2024 19:03 IST

राज्यशासन, महापालिकेसह तिघांना नोटीस : १९ सप्टेंबरपर्यंत द्यायचे आहे उत्तर

प्रदीप भाकरे अमरावती: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या निवडीने झालेल्या नियुक्तीला येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर द्विसदस्यीय खंडपीठाने ८ ऑगस्ट रोजी सुनावणी घेत राज्यशासन, अमरावती महानगपालिका व महेश देशमुख यांना नोटीस जारी केल्या आहेत. १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना उत्तर द्यावयाचे आहे.             

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातील नितीन सांबरे व अभय मंत्री या द्विसदस्यीय पिठाने त्या नोटीस जारी केल्या आहेत. महेश देशमुख यांची नियुक्ती-पदोन्नती ही न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधिन राहिल, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने ५ मार्च २०२४ रोजी आदेश काढून अमरावती महापालिकेतील पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांची अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने नियुक्ती केली आहे. त्या निवडीला महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ८ ऑगस्ट रोजी नोटीस जारी केल्या.

असा आहे आक्षेपमहापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्तपदी त्याच आस्थापनेवरील अधिकाऱ्याची निवडीने नियुक्ती करताना त्या अधिकाऱ्याची नियुक्ती ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५ मधील पदावर झालेली असावी. अर्थात तो अधिकारी शहर अभियंता, शिक्षणाधिकारी वा वैद्यकीय अधिकारी असावा, असे शासननिर्णयात नमूद आहे. मात्र महेश देशमुख हे धारण करत असलेले पर्यावरण संवर्धन अधिकारी हे पद कलम ४५ मध्ये अंतर्भूत नाही. त्यामुळेच ५ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महेश देशमुख यांना ‘नॉट क्वालिफाईड’ ठरविण्यात आले. समिती देशमुख यांची शिफारस करीत नाही, असे म्हटले गेले. त्यावर डॉ. काळे यांनी बोट ठेवले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती