शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
3
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
4
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
5
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
6
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
7
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
8
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
9
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
10
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
11
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
12
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
13
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
14
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
15
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
16
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
17
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
18
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
19
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
20
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

२४ दिवसांत १६ कोटी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:17 IST

यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २ मार्चपर्यंत २७.४० कोटींची वसुली झालेली आहे. ही ६३.५२ टक्केवारी आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत उर्वरित २४ दिवसांत १५.७६ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.

ठळक मुद्देमालमत्ता कर : सुटीच्या दिवसी शिबिरे, कर वसुलीच्या हालचाली गतिमान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २ मार्चपर्यंत २७.४० कोटींची वसुली झालेली आहे. ही ६३.५२ टक्केवारी आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत उर्वरित २४ दिवसांत १५.७६ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.मालमत्ता करांची वसुली अधिक होण्याच्या दृष्टीने कर विभागाने कडक धोरणाचा अवलंब केला आहे. यामध्ये एक लाखांवर करवसुली थकीत ५७ थकबाकीदारांना जप्ती नोटीस बजावली. या थकबाकीदारांकडे सध्या ८१ लाख १७ हजार ५४८ रुपयांची वसुली बाकी आहे. आयुक्तांचे आदेशानुसार ३६ मालमत्ताचे लिलाव ८ मार्चला होईल.महापालिकेच्या आर्थिक बजेटनुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ९५० कोटींचा एकूण खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यामध्ये महसुली खर्च ३६१ कोटी, भांडवली खर्च ४४१ कोटींचा राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने स्वउत्पन्नातून विकास कामे करणे ही बाब दुरापास्त झालेली आहे. महापालिकेच्या मालमत्ता करात नवीन कराची आकारणी करून उत्पन्नवाढ गृहीत धरली असताना मात्र, तसे झालेले नाही. याउलट यामध्ये कमी आलेली आहे. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून व याविषयीचे नियोजन करून उत्पन्नाचे स्त्रोतात वाढ करणे ही काळाची गरज ठरत आहे.अशी आहे मालमत्ता कराची मागणीमहापालिकेच्या पाच झोनमध्ये ४३ कोटी २३ लाख ३३ हजार ६४७ रूपयांच्या मालमत्ता कराची मागणी आहे. यामध्ये उत्तर झोनमध्ये ११.८९ कोटी, मध्य झोनमध्ये ११.९५ कोटी, पूर्व झोनमध्ये ४.१२ कोटी, दक्षिण झोनमध्ये ११.९६ कोटी व पश्चिम झोनमध्ये ३.२८ कोटींच्या करांची मागणी आहे. त्या तुलनेत २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली झाली, ही ३२.०४ टक्केवारी आहे. उर्वरित १०० दिवसांत २५.७२ कोटींच्या वसुलीचे दिव्य महापालिकेला पार पाडावे लागतील.सध्या २७.४६ कोटींची वसुली झाली आहे. आता ३६ मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार आहे. थकबाकी असणाऱ्या ५६ मालमत्ताधारकांना जप्तीनामा बजावले.- महेश देशमुख,उपायुक्त, महापालिका