शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:07 IST

टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेली तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय शासनाने २१ जुलै रोजी घेतला.

३१ जुलै ‘डेडलाईन’: रविवारी फक्त दोन हजार क्विंटल खरेदीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेली तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय शासनाने २१ जुलै रोजी घेतला. जिल्ह्यात एकूण चार लाख १६ हजार क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे. मात्र यंत्रणांव्दारा रोज १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी आजवर झाली नसल्याने ३१ जुलै या ‘डेडलाईन"च्या आत एवढी तूर खरेदी करणे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.यासंदर्भात पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांसी चर्चा करून लगेचच केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात, त्यानुसार रविवारी तीन केंद्रांवर दोन हजार ६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर सहा शेतकऱ्यांची १२३ क्विंटल, अमरावतीला ५९ शेतकऱ्यांची एक हजार ६६८ क्विंटल व चांदूरबाजार केंद्रावर चार शेतकऱ्यांची २७४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अद्याप १८ हजार ५७६ शेतकऱ्यांची चार लाख १४ हजार क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. आजवर यंत्रनांव्दारा १० ते १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी करण्यात आली नसल्याने ३१ जुलै या अंतिम मुदतीच्या आत चार लाख क्विंटल तूर खरेदी करणे हे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. यामध्येदेखील २७ जुलै रोजी नागपंचमी असल्याने जिल्ह्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद राहणार आहे. रविवारी तीन केंद्र सुरू करण्यात आल्यावर सोमवारी धारणी वगळता उर्वरित नऊ केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे व डीएमओ अशोक देशमुख यांनी दिली.तुरीत आर्द्रता असल्यास कमी भावसद्या पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे तुरीच्या साठ्यात एफएक्यू निकषापेक्षा जास्त आर्द्रता असल्यास हमी भावाच्या किंमतीत आर्द्रतेच्या प्रमाणानुसार भावात कमी-जास्त ग्रेडरच्या सल्लयानेने करण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांव्दारा शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकण्याचा प्रकार झाल्यास त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.