शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:20 IST

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला.

ठळक मुद्देपोलिसांची दमछाक : ४० फूट उपसा, तरीही पाणी शिल्लक

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला. विहिरीतील तो मोबाइल बाहेर काढण्यासाठी गाडगेनगर पोलीस दोन दिवसापासून पाण्याचा उपसा करीत आहेत. मात्र, अजूनही विहिरीत २० ते ३० फूट पाणी शिल्लक असल्यामुळे मोबाइल शोधण्याचे आव्हान कायमच आहे.शीतल पाटील हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील गजभिये, त्याचा साथीदार रहमान खान, गुन्ह्यात सहकार्य करणारा गडचिरोलीतील शिवदास गोंडाणे व गजभियेची पत्नी राजेश्री यांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामी पोलीस लागले आहेत.शीतल पाटीलच्या हत्येनंतर तिचा मोबाइल विहिरीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यानुसार गाडगेनगर पोलीस विहिरीत फेकलेल्या मोबाइलचा शोध घेत आहेत. यासाठी विहिरीतील पाण्याचा उपसा करून मोबाइल हाती लागेल, या आशेवर पोलीस आहेत. बुधवारी सायंकाळपासून गाडगेनगर पोलीस विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याच्या कामी लागले. दोन मशीनद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सातत्याने सुरुच आहे. मात्र, सुमारे ५० फूट व्यास असणाऱ्या या विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात पोलिसांची दमछाक उडाली आहे. दोन दिवसात २० फुटांवर पाण्याचा उपसा करण्यात आला असला तरी अद्याप पाण्याची बरीच पातळी शिल्लक आहे. त्यातच विहिरीतील झºयांमुळे पुन्हा विहिरीत पाणी जमा होत असल्याने उपसा करणेही कठीण झाले आहे. मात्र, शीतलचा मोबाइल बाहेर काढणे तपासासाठी आवश्यक ठरले आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळते किंवा नाही, ही बाब मोबाइल सापडल्यावर कळणार आहे. शनिवारी गजभिये व रहमानला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.निर्जन स्थळावरील विहिरीतून रहस्य उलगडणार का?एक्स्पे्रस हायवेवरील विहिरीजवळ देहविक्रीचा अड्डाच असल्याचे आढळून आले होते. त्या ठिकाणी सापडलेले आक्षेपार्ह साहित्य प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांचे कथन करणारे होते. अशा आक्षेपार्ह स्थळावरील विहिरीचा उपसा सुरु झाला असून, विहिरीचे तळ गाठल्यानंतर आणखी तथ्य पुढे येण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस हायवेवरून सातत्याने मोठ्या वाहनांचे आवागमन सुरु राहते. अनेकदा ट्रकचालकांचे वाद होतात. अशा वेळी गुन्हे लपविण्यासाठी विहिरीचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.विहिरीचा उपसा सातत्याने सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत तळ गाठले नाही. पाणी अधिक असल्यामुळे तळ गाठण्यास वेळ लागत आहे. तळ गाठेपर्यंत पाण्याचा उपसा करूच.- मनीष ठाकरे,पोलीस निरीक्षक,