शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

गुन्हे शाखेसमोर ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ जाण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:06 IST

‘टीप’ प्रकरणाचे तत्कालिक कारण असो की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, ठपका कुठलेही असो पोलीस आयुक्तांनी गुन्हेशाखेत मोठा फेरबदल केला आहे.

नखशिखांत बदल : पाटलांकडे नव्या दमाचे सवंगडी अमरावती : ‘टीप’ प्रकरणाचे तत्कालिक कारण असो की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, ठपका कुठलेही असो पोलीस आयुक्तांनी गुन्हेशाखेत मोठा फेरबदल केला आहे. पोलीस निरीक्षकांपासून कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करीत गुन्हे शाखेत नव्यांची वर्णी लागली. टीप प्रकरणाने ‘दाग’दार झालेल्या गुन्हे शाखेत नखशिखांत बदल करुन आयुक्तांशी ‘स्वच्छता’ अभियानच राबविल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मग वर्तुळात उमटली. पोलिस निरीक्षक आत्राम, उपाध्यायसह १० पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीला स्वच्छेताचा नामानिधान दिल्यास ‘दिलीप पाटलांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेला आता ‘डिटेक्शनरुपी’ समृद्धीकडे जाण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशन संपल्याबरोबर पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी धाडसी निर्णय घेत संशयास्पद वागणुकीचा ठपका ठेवत गुन्हे शाखेतील १० पोलिसांना ‘मुख्यालयाशी संलग्न केले. त्याचबरोबर पोलिस डिजीटल प्रमेश आत्राम आणि सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांचा आयुक्तालयातच अन्यत्र बदल्यांचे आदेश काढलेत. शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटिल यांच्याकडे गुन्हे शाखेचा ‘भार’ सोपविण्यात आला. त्यासोबत दोन सहायक पोलिस निरीक्षक आणि दो उपनिरीक्षकांना गुन्हे शाखेत स्थानांतरित केले. अगदी नखशिखांत नवीन टीम गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस आयुक्तांनी विश्वास उर्थवित गुन्हे शाखेत ‘एन्ट्री’ दिलेल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता काहीतरी ‘करुन’ दाखविण्याचे आव्हान आहे. ट्रक टिप प्रकरणाने गुन्हे शाखेची पोलिस वर्तुळासह समाजातही मोठी बदनामी झाली होती. त्यानंतर अख्खी गुन्हेशाखाच बदलून टाकत आयुक्तांनी गुन्हे शाखेत ‘नवागडी - नवा राज’ हे सूत्र अवलंविले. वरली मटका, जुगारासह अन्य गुन्हेगारीवर अंकुश राखण्याचे अजस्त्र आव्हान आता दिलीप पाटील यांना पेलावे लागणार आहे. ‘डिटेक्शन’ हा गुन्हे शाखेचा आत्मा मानला जातो. शहराच्या विविध पोलिस ठाण्यातर्गत येणाऱ्या अवैध धंद्यावर अंकुश राखण्याची मोठी जबाबदारीही गुन्हे शाखेवर असते. दिलीप पाटिल यांनी आपली टीम निवडतांना शहर कोवालीतील काही सहकाऱ्यांना सामावून घेतले आहे. शहराचा क्राईम गु्रप वाढत चालल्याची ओरड, चेन स्नॅचर आणि मोबाईल, दुचाकी चोरट्यांनी उभे केलेले आव्हान, अशा विविध पातळ्यांवर पाटील यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेला स्वच्छतेकडून समृद्धीकडे मार्गक्रमण करावयाचे आहे.गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखेचा बाज बिघडला होता. त्यातच टिप प्रकरणाने रयाच बिघडून गेली. शहरात फ्रेजरपुरासह अन्यही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांनी डोके वर काढले. मात्र त्यावर अंकूश ठेवण्यात तत्कालिन गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी अयशस्वी ठरले. त्या पार्श्वभूमिवर पाटील यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेवर मोठी मदार आहे. डिटेक्शनवर भर देवून क्राईम ग्राफ खाली आणण्याचे आव्हान आहे.