शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

१०० दिवसांत २६ कोटी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:00 IST

यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.

ठळक मुद्देजीएसटीवरच डोलारा : सद्यस्थितीत १७.५१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असताना २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे. तूर्तास जीएसटी अनुदानावरच महापालिकेचा आर्थिक डोलारा सुरू आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था व मालमत्ता कर हे दोन प्रमुख व महत्त्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत होते. मात्र, शासनाने आॅगष्ट २०१५ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद करून महापालिकांना स्थानिक प्राधिकरणाला भरपाई देणारा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत अनुदान देण्याचे जाहीर केले. या करासह मालमत्ता करावरच महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा आहे. वास्तविकत: आस्थापना खर्चात झालेली वाढ महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत अधिक बळकट करणे महत्त्वाचे झालेले आहे. महापालिकेद्वारा गतवर्षी १.५३ लाखांपैकी १.५२ लाख मालमत्तांचे असेसमेंट केले आहे. अद्याप काही बाकी आहेत. यामधून देखील मालमत्ता उघड होतील, अशी प्रशासनाला आशा आहे.महापालिकेच्या आर्थिक बजेटनुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८१४.१९ कोटींचा एकूण खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यामध्ये महसुली खर्च ३६२.८७ कोटी, भांडवली खर्च ४४०.७० कोटींचा राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने स्वउत्पन्नातून विकासकामे करणे, ही बाबा दुरापास्त झालेली आहे. महापालिकेच्या मालमत्ता करात नवीन कराची आकारणी करून उत्पन्नवाढ गृहीत धरली असताना मात्र, तसे झालेले नाही. याउलट यामध्ये कमी आलेली आहे. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून व याविषयीचे नियोजन करून उत्पन्नाच्या स्त्रोतात वाढ करणे, ही काळाची गरज ठरत आहे.अशी आहे मालमत्ता कराची मागणीमहापालिकेच्या पाच झोनमध्ये ४३ कोटी २३ लाख ३३ हजार ६४७ रूपयांच्या मालमत्ता कराची मागणी आहे. यामध्ये उत्तर झोनमध्ये ११.८९ कोटी, मध्य झोनमध्ये ११.९५ कोटी, पूर्व झोनमध्ये ४.१२ कोटी, दक्षिण झोनमध्ये ११.९६ कोटी व पश्चिम झोनमध्ये ३.२८ कोटींच्या करांची मागणी आहे. त्या तुलनेत २० डिसेंबरपर्यंत १७.५१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली झाली, ही ३२.०४ टक्केवारी आहे. म्हणजेच उर्वरित १०० दिवसांत २५.७२ कोटींच्या वसुलीचे दिव्य महापालिकेला पार पाडावे लागणार आहे.मालमत्ता कर वसुलीसाठी फिक्स पॉइंटवर सुटीच्या दिवशी शिबिर घेण्यात येत आहेत. सध्या १७.५१ कोटींची वसुली झालेली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी कराचा भरणा न केल्यास दोन टक्के दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने त्यापूर्वी नागरिकांनी कराचा भरणा करणे महत्त्वाचे ठरते.- महेश देशमुख, उपायुक्त, महापालिका

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका