शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी एकला चेनस्नॅचिंग, तासाभरानंतर चेनस्नॅचर्स अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: October 11, 2024 17:35 IST

गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई : एक विधीसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात,

प्रदीप भाकरे अमरावती : पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या दोन भामट्यांना घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. सोबतच एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव परिसरात घडली होती. अभिषेक उर्फ टोबो आनंदीलाल साहू (२२, रा. संतोषीनगर, अमरावती) व इमरान खान बिसमिल्ला खान (२५, रा. आझादनगर, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या चेनस्नॅचर्सची नावे आहेत.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथील रहिवासी प्रतिभा अरुण आठवले (४५) या गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पतीसह दुचाकीने रहाटगाव येथून जात होत्या. त्यावेळी रस्त्यावर दुचाकी घेऊन तीन तरुण उभे होते. त्यातील एकाने प्रतिभा आठवले यांना पत्ता विचारला. त्याचवेळी दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील ३१ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरीने हिसकाविले. त्यानंतर तिनही लुटारू दुचाकीने तेथून पळून गेले. घटनेनंतर प्रतिभा आठवले यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकनेही घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासात या गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ टोबो याचा हात असल्याचे समोर आल्यावर त्याला विलासनगर भागातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने हा गुन्हा इमरान खान व विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून केल्याची कबुली दिली. त्यानुसार इमरान खानला अटक करून विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.

मंगळसूत्र, दुचाकी जप्तदोन आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र व दुचाकी असा एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, सतीश देशमुख, फिरोज खान, अलीमउद्दीन खतीब, नाझीमउद्दीन सय्यद, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अमोल मनोहर, रोशन माहुरे, किशोर खेंगरे, सायबरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, निखिल माहुरे, अनिकेत वानखडे यांनी केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी