शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालय प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य, प्रवेशप्रक्रियाही लागू; २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून अंमल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 17:12 IST

कृषीविषयक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सोबतच प्रवेशप्रक्रिया लागू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

अमरावती : कृषीविषयक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सोबतच प्रवेशप्रक्रिया लागू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासंदर्भात २ फेब्रुवारीला शासननिर्णय पारित करण्यात आला असून, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ही महत्त्वपूर्ण सुधारणा अंमलात येणार आहे.राज्यातील शासन मान्यताप्राप्त व कृषी विद्यापीठाशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठांतर्गत घटक महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी आणि प्रवेशप्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्टÑ विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम २०१५ मध्ये सीईटी आणि प्रवेशप्रक्रिया लागू करण्याची तरतूद आहे. तथापि, राज्यातील शासन मान्यताप्राप्त व कृषी विद्यापीठाशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांसह शासकीय कृषी महाविद्यालयांतील व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया व सामायिक प्रवेश परिक्षेबाबत स्पष्टता नव्हती. ती सुस्पष्टता यावी व एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिनियमाच्या कलम २३ अन्वये तयार करण्यात आलेल्या नियमातील तरतुदीनुसार आयुक्तांच्या स्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा राबविण्याचा निर्णय कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाने घेतला आहे.

या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी सीईटी- बी.एस्सी. (आॅनर्स, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या)- बी.एस्सी. आॅनर्स (सामाजिक विज्ञान)- बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान)- बी.टेक. (जैवतंत्रज्ञान) हे अभ्यासक्रम व्यावसायिक, शैक्षणिक अभ्यासक्रम घोषित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे.