लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला. ४८० संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी, तर विद्याशाखानिहाय गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना ११२ सुवर्ण व २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ४०,६३५ पदवी, तर ७२ पदविका या सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या.विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यासाठी मंडप साकारण्यात आला. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते, तर दीक्षांत भाषण केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, प्रदीप खेडकर, वसंत घुईखेडकर, मीनल ठाकरे, प्रफुल्ल गवई, नीलेश गावंडे, उत्पल टोंगो, सुनील मानकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, व्ही.डब्ल्यू. निचत, मनीषा काळे, भारत कºहाड आदी उपस्थित होते.दीक्षांत समारंभाच्या प्रारंभी पाहुण्यांचे मिरवणुकीने आगमन झाले. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ना. संजय धोत्रे व कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी विद्यार्थ्यांना पदके, पारितोषिके देऊन गौरविले. सर्वाधिक सहा सुवर्णपदके, एक पारितोषिक पटकाविणारा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजित इंगळे आणि पाच सुवर्णपदके मिळविणारी सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पाल हिचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.दीक्षांत सोहळ्याला विद्यापीठगीताने प्रारंभ झाला. संचालन हेमंत खडके व मोना चिमोटे यांनी केले. स्वागतगीत महात्मा फुले महाविद्यालयाच्या चमूने सादर केले. समारंभाची राष्ट्रगीताने सांगता झाली. व्यासपीठावर पाण्याच्या बॉटलऐवजी तांब्याचे भांडे होते. राज्यपालांनी पारंपरिक खुर्ची नाकारली, हे विशेष.स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाचे आठ मानकरीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दीक्षांत समारंभात विविध विषयांत गुणवत्ताप्राप्त आठ विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाने गौरविले. यात स्थानिक सिपना अभियांत्रिकीची विद्यार्थिनी साक्षी रामचंद्र पाल, आफरीन इस्राईल अली, यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाची मयूरी शिरभाते, अश्विनी अर्जुन आवारे, जास्मीन कासीम लालानी, बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा महेश उल्हे, समीक्षा कांबळे, अमरावती येथील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुतिका महल्ले यांचा समावेश आहे.
दीक्षांत समारंभात ११२ सुवर्ण २२ रौप्यपदकांची लयलूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST
सर्वाधिक सहा सुवर्णपदके, एक पारितोषिक पटकाविणारा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजित इंगळे आणि पाच सुवर्णपदके मिळविणारी सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पाल हिचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
दीक्षांत समारंभात ११२ सुवर्ण २२ रौप्यपदकांची लयलूट
ठळक मुद्देराज्यपालांनी गौरविले : ४८० पीएचडीही, मुलीच ठरल्या सरस