शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती किचन गुंडाळले!

By admin | Updated: August 5, 2016 00:25 IST

विद्यार्थ्यांना उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन स्थापन करण्याचे सुतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक सत्रात केले होते.

अनास्था : केव्हा होणार अंमलबजावणी? अमरावती : विद्यार्थ्यांना उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन स्थापन करण्याचे सुतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक सत्रात केले होते. मात्र नवे सत्र सुरू होऊन महिना उलटून गेला तरी अद्याप याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत त्यामुळे ही योजनाच राज्य शासनाने बासनात गुंडाळून ठेवली असल्याचा आरोप होऊ लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन सुरू करण्याचा विचार शिक्षण विभागाने सुरू केला होता. २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रापासून राज्यात ही योजना राबविली जाईल, असे जाहीर देखील करण्यात आले होते. इस्कॉन आणि अक्षयपात्र सारख्या नामवंत संस्थांकडून त्यासाठी संपूर्ण अर्ज व प्रक्रियेची संपूर्ण माहितीही मागविण्यात आली होती. मात्र त्यानंतर राज्य शासनाच्या स्तरावर या संदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना दिला जात असलेल्या पोषण आहाराबाबत सातत्याने तक्राार येत असतात. जिल्ह्यातही पोषण आहाराचे प्रकरण आणि त्यातील हलगर्जीपणा यावर टीका झाली होती. असे प्रकार टाळण्यासाठी तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये सुरू असलेली मध्यवर्ती किचन सारखी संकल्पना राज्यातही राबविण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. नवीन शैक्षणिक सत्रापासून ही योजना राबविली जाईल असे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्च २०१६ मध्ये काढले होते. यासाठीच्या संस्थांची शासन नियुक्ती करेल आणि त्या संस्थांमार्फत शाळांना दर्जेदार पोषण आहार पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. ज्या जुन्या संस्था किंवा बचत गट यांच्याशी शाळांनी करार केले होते त्याचे नुतनीकरण केले जाऊ नये अशाही सूचना मार्च महिन्यात देण्यात आल्या होत्या. मात्र नव्या शैक्षणिक सत्रात यापैकी गोष्ट अंमलात आलेली नाही. मध्यवर्ती किचन संकल्पनेला बचतगटांच्या संघटनांनी विरोध केला होता. एकीकडे पोषण आहाराबाबतचा सातत्याने तक्रारी येत असताना मध्यवर्ती किचनबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे हा विषय गुंडाळला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)