शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बॅटरी व्यवसायाने केंद्र सरकारचे नियम गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:00 IST

अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

गणेश वासनिक अमरावती : अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून पर्यावरण प्रमाणपत्र न मिळविता राज्यात हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने १५ मे २००१ रोजी ‘दी बॅटरीज मॅनेजमेंट अँड हॅँडलिंग’ नियमावली  तयार केली. यानुसार वाहनांमधील बॅटरीची निर्मिती, पुनर्वा$पर आणि विक्रीबाबत परवाना आवश्यक आहे. बॅटरी अ‍ॅसिडची केंद्र सरकारने धोकादायक म्हणून नोंद केली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानांची एमपीसीबीकडून पर्यावरण तपासणीदेखील बंधनकारक आहे. परंतु, राज्यात बहुतांश बॅटरी व्यवसाय आणि उद्योगाशी निगडित ठिकाणे, विक्री करणारी प्रतिष्ठाने यांनी परवाना मिळविलेला नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेला १६ वर्षे झाली आहेत. परंतु, राज्यात २६ महापालिका व २५६ नगरपालिकांमध्ये या विषयात कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने बॅटरी व्यवसायासंदर्भात कोणतेही आदेश निर्गमित केलेले नाहीत.

अ‍ॅसिडमुळे नागरी वस्त्यांना धोकाबॅटरी निर्मिती, पुनर्वापर आणि विक्री प्रतिष्ठाने ही बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये आहेत. परवानगी देताना महापालिका, पोलीस अथवा शॉप अ‍ॅक्ट अधिकाºयांनी सदर प्रतिष्ठानच्या संचालकांनी पर्यावरण विभागाशी संबंधित ना-हरकत प्रमाणपत्र घेतले काय, याची खारतजमा करणे आवश्यक आहे. कें द्र सरकारची तशी अधिसूचना आहे.

उद्योग, व्यवसायास पर्यावरणासंदर्भात परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहेत. त्यामुळे महानगरात बॅटरी निर्मिती, विक्री अथवा हाताळणी होत असली तरी पर्यावरणविषयक बाबी तपासणीचे अधिकार एमपीसीबीकडे आहे.- महेश देशमुख, उपायुक्त तथा पर्यावरण अधिकारी, अमरावती महापालिका