शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट पोल अंगावर पडला, तरुण जागीच ठार; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: March 21, 2023 13:07 IST

कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अमरावती : शेतशिवारातील जुना तिरपा सिमेंट पोल सरळ करत असताना तो तुटून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला, २० मार्च रोजी दुपारी ३.३० पुर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फसी ते जयसिंगा रोडवरील वासुदेव सैरिसे यांच्या शेतात ही घटना घडली. संकेत उर्फ दीप राधेश्याम गाठे (१९, रा. ढवलसरी) असे मृताचे नाव आहे. 

याप्रकरणी गौरव गाठे याच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी २० मार्च रोजी रात्री महावितरणचा कंत्राटदार दिनेश मनोहर वसंतकार (रा. अकोला) याच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत हा महावितरणची टेंडरधारक असलेल्या लक्ष्मी एंटरप्रायजेस, अकोला या कंपनीसाठी मजुरीचे काम करीत होता. २० मार्च रोजी दुपारी तो महावितरणच्या बडनेरा उपविभागातील जयसिंगा शिवारात काम करत होता. तेथील जुना तिरपा झालेला इलेक्ट्रिकचा सिमेंट पोल दोरीने बांधून सरळ करण्याकरीता ओढत होता. अचानक तो पोल खालच्या बाजुने तुटून संकेतच्या तोंडावर पडला, त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळीच ठार झाला. आरोपी कंत्राटदाराच्या हयगयीमुळे आपल्या भावाला प्राण गमवावे लागले, अशी तक्रार मृत संकेतचा भाऊ गौरव (२१, रा. ढवलसरी) याने लोणी पोलिसांत नोंदविली.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती