शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळांचे होणार ‘क्रॉस चेकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:01 IST

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शैक्षणिक संस्थाचालकांनी सीबीएसई मान्यता असल्याचे सांगून दुकानदारी चालविली आहे. सीबीएसईच्या नावे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वसूल होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून अमरावतीत केवळ १६ शाळांनाच सीबीएसई मान्यता आहे.

ठळक मुद्देआयुक्त, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार : जिल्ह्यात १६ शाळांनाच मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई मान्यता असल्याचे फलक लावून पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाºया बनावट सीबीएसई शाळांचे ‘क्रॉस चेकिंग’ होणार आहे. अमरावतीत सीबीएसईच्या केवळ १६ शाळा असताना बहुतांश शाळांनी सीबीएसईचे फलक लावले आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शैक्षणिक संस्थाचालकांनी सीबीएसई मान्यता असल्याचे सांगून दुकानदारी चालविली आहे. सीबीएसईच्या नावे पालकांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वसूल होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून अमरावतीत केवळ १६ शाळांनाच सीबीएसई मान्यता आहे. येत्या काही दिवसांत सीबीएसई शाळांचे फलक लावून दुकानदारी चालविणाऱ्या संचालकांवर फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात येईल, असे संकेत आहेत. महापालिका शिक्षक संघाच्यावतीने योगेश पखाले यांनी तक्रार नोंदविली आहे.हे आहेत सीबीएसई शाळेचे निकष२०० मीटर रनिंग ट्रॅक, गणित प्रयोगशाळा, अध्यापनपूरक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र खोली, ग्रंथालय, सहा हजार मीटर जागा, प्रत्येक वर्गखोली ५०० मीटर, शाळेचे स्वतंत्र संकेतस्थळ, शाळेचा ६० हजार रुपये राखीव फंड, असे निकष आहेत.याच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नपी.आर.पोटे, अभ्यासा इंग्लिश स्कूल, महर्षि पब्लिक स्कूल, स्कॉलर्स कॉन्व्हेंट, एडीफाय कठोरा, इंडो पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल, तोमई स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स निंभोरा, शिवाजी आयडियल स्कूल, सूर्यकांता पोटे मिडल स्कूल, टायटन्स पब्लिक स्कूल बडनेरा, विनायका गुरूकुल छत्रीतलाव, विश्र्वभारती पब्लिक स्कूल, गुरूकुल पब्लिक स्कूल.तक्रारीच्या अनुषंगाने सीबीएसई शाळांच्या मान्यतेबाबतची तपासणी होईल. शिक्षणाधिकाºयांना सूचना केली आहे. बोगसबाजी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र