लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने परतवाडा-अमरावती मार्गावरील अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तांदळाचा ट्रक पकडला.एम.एच. १७ एजी ३३४१ क्रमांकाच्या या ट्रकमध्ये तांदळाचे चारशे कट्टे पोलीस पथकाला आढळून आले. हा ट्रक परतवाड्याहून गोंदियाला जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याची माहिती अचलपूर पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख यांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर घटनास्थळी दाखल झाल्यात.तांदळाचा ट्रक ज्या गोडाऊनमधून भरला गेला, ते गोडाऊन अमरावती मार्गावरील फौजी ढाब्यालगत आहे. या गोडाऊनमधील तांदळाचा साठा पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर यांनी तपासला. यात गोडाऊनमध्येही त्यांना तांदळाचे पोते (कट्टे) आढळून आलेत. यामुळे पुरवठा विभागाकडून ते गोडाऊन सील करण्यात आले आहे. पोलिसांनी सदर ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला. जप्त साहित्याचे मालक बंडू अग्रवाल यांना नोटीस देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जबाबासह आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.संबंधितांवर यापूर्वी २०१८ मध्येसुद्धा तांदूळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यावेळी जप्त तांदळाचे ३५० कट्टे पुरवठा विभागाने परत केले होते. याच प्रकरणातील न्यायालयाचा तो आदेश बुधवारी चौकशी अधिकाऱ्यांना त्यांना दाखवला.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अचलपूर-चांदूर बाजार मार्गातील गोडाऊन सील करण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे.- शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षण अधिकारी, अचलपूर
चांदूर बाजार नाक्यावर तांदळाचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST
तांदळाचा ट्रक ज्या गोडाऊनमधून भरला गेला, ते गोडाऊन अमरावती मार्गावरील फौजी ढाब्यालगत आहे. या गोडाऊनमधील तांदळाचा साठा पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर यांनी तपासला. यात गोडाऊनमध्येही त्यांना तांदळाचे पोते (कट्टे) आढळून आलेत. यामुळे पुरवठा विभागाकडून ते गोडाऊन सील करण्यात आले आहे. पोलिसांनी सदर ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला. जप्त साहित्याचे मालक बंडू अग्रवाल यांना नोटीस देण्यात आली आहे.
चांदूर बाजार नाक्यावर तांदळाचा ट्रक पकडला
ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : गोडाऊन सील, ट्रक पोलीस ठाण्यात