शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांची नाडी पकडली; आरोग्यासाठी नवे मोहल्ला क्लिनिक, महापालिकेचा अर्थसंकल्प ८५० कोटींचा

By प्रदीप भाकरे | Updated: March 28, 2023 19:37 IST

शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्र व नव्याने उभारल्या जाणाऱ्या २९ हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटरसह अमरावतीकरांना मोहल्ला पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा

अमरावती :

शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्र व नव्याने उभारल्या जाणाऱ्या २९ हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटरसह अमरावतीकरांना मोहल्ला पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याची घोषणा प्रशासक तथा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी केली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सुमारे ८४९ कोटी ७१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी अमरावतीकरांच्या शाश्वत विकासासाठी नव्या व कल्पक योजनांचा संकल्प देखील सोडला. यातील सर्वाधिक ३६ टक्के खर्च हा आरोग्य व स्वच्छतेवर होणार असल्याचे आयुक्त म्हणाले.दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर सुमारे तीन कोटी रूपये खर्चून या पाॅलिक्लिनिकची उभारणी केली जाणार आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देतील. आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून महापालिकेचा जंबो अर्थसंकल्प मांडला. त्यात ४० कोटींवर स्थिरावलेल्या मालमत्ता करात तब्बल ११९ कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. अर्थसंकल्प मांडताना उपायुक्त डाॅ. मेघना वासनकर व डॉ. सीमा नैताम, मुख्य लेखापरीक्षक राम चव्हाण, शहर अभियंता इकबाल खान, एडीटीपी घनश्याम वाघाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, प्रभारी कॅफो प्रवीण इंगोले, महिला बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, योगेश पिठे, तौसिफ काझी व श्रीरंग तायडे, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन बोंद्रे आदी उपस्थित होते.

अशी आहे नवसंकल्पना बजेटज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना : ५० लाखमहिला बचत गटासाठी माॅल : एक कोटीनवीन नाट्यगृह, कलादालन : एक कोटीमहिला, तृतीयपंथीयांसाठी शाैचालय : ५० लाखसार्वजनिक प्रसाधनगृह उभारणे : १.५० कोटीवातानुकूलित ड्रग सेंटर उभारणी : तीन कोटीश्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रम : एक कोटीडेकोरेटिव्ह लॅम्प : ५० लाखआदर्श रस्ता विकास : १८ कोटीई वाहन खरेदी : २५ लाखपॉलिक्लिनिक उभारणी : तीन कोटी मालमत्ता करांत ११९ कोटींची वाढसन २०२२/२३ मध्ये शहरातील एकूण २.९८ लाख मालमत्तांचे नंबरिंग झाले असून, पैकी सुमारे दाेन लाख ९१ हजार मालमत्तांची कर सर्वेक्षण झाले आहे. त्यातून सन २०२३/ २४ मध्ये पालिकेच्या मालमत्ता कर मागणीमध्ये तब्बल ११९ कोटींची वाढ होणार आहे. थकबाकी वगळून फ्रेश ४० कोटींची मागणी पाहता पुढील आर्थिक वर्षात एकूण मागणी १६० कोटींवर जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षणामध्ये तब्बल एक लाख ३७ हजार मालमत्ता नव्याने कराच्या कक्षेत येणार आहे.पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करांमधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये सुमारे ११९ कोटींची वाढ अपेक्षित आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी काही नवसंकल्प सोडले आहेत. त्या नव्या योजनांसाठी भरीव तरतूददेखील केली आहे.- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Amravatiअमरावती