सातुर्णा चौकात दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:55+5:302021-02-23T04:20:55+5:30

----------------------------------------------------------- अवैध दारूसह ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त अमरावती : राजपेठ पोलिसांनी येथील सातुर्णा चौकात कारवाई करून मंगेश नामदेवराव पुरी ...

Caught alcohol in Saturna Chowk | सातुर्णा चौकात दारू पकडली

सातुर्णा चौकात दारू पकडली

Next

-----------------------------------------------------------

अवैध दारूसह ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त

अमरावती : राजपेठ पोलिसांनी येथील सातुर्णा चौकात कारवाई करून मंगेश नामदेवराव पुरी (४०), पवन ज्ञानेश्वर भुजाडे (२८, दोन्ही रा. वडुरा, ता. चांदूर बाजार) विरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी व ८,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

------------------------------------------

सिद्धार्थ मंडळाजवळ दारू जप्त

अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील सिद्धार्थ मंडळनजीक कारवाई करून दुचाकी व अवैध दारू असा एकूण ३०,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी आयूब पीरू हंसावाले (३०, रा. फ्रेजरपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-----------------------------------

प्रभात चौकात दारू जप्त

अमरावती: सिटी कोतवाली पोलिसानी येथील प्रभात चौकात कारवाई करून अवैध दारु व दुचाकी असा एकूण ६१,४४० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

आरोपी सुरज मनोहर जामोदकर (३२, रा. शोभानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------------

केवल कॉलनीतून दुचाकी लंपास

अमरावती: गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीतून ८० हजार रूपये किंमतीच दुचाकी एमएच३२एपी ६०११ क्रमांकाची अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना २० फेब्रुवार रोजी घडली. या प्रकरणी पोलिसानी सोमवारी गुन्हा नोंदविला. फिर्यादी रोशन नरेंद्र मानकर (२८, रा. पुलगाव ह. मु. शेगाव) याने पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

--------------------------------

लालखडी येथे वृद्धावर चाकूने वार

अमरावती : क्षुल्लक कारणावरून एका वृद्धावर चाकुहल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना लालखडी येथे सोमवारी घडली. आरोपी आबीद अब्दुल मजिद याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी सलीम अली वल्द मुजाहीद अली (६०, रा. लालखडी) यांनी नागपुरी गेट ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Caught alcohol in Saturna Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.