शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी'

By गणेश वासनिक | Updated: November 14, 2023 13:50 IST

आदिवासी समाजात आरक्षणासाठी घुसखोरी, धुळे समितीकडून जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त

गणेश वासनिक, अमरावती : देशाचे राष्ट्रपती यांनी घोषित केलेली अनुसूचित जमातीची यादी 'जशी आहेत तशीच' वाचणे व लिहिणे आवश्यक आहे. त्यानुसार जमातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असताना मात्र जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्याने जात 'हिंदू कोळी' असताना 'टोकरे कोळी' अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल पोपट सपकाळे हे जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यातील सुनोदे गावचे रहिवासी आहे. उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी त्यांना १५ सप्टेंबर २०२२ रोजी 'टोकरे कोळी' जमातीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याचा आऊटवर्ड क्रमांक ३९६२१३१६९१२ असा आहे. या संदर्भात राहूल सुकदेव चव्हाण यांनी समितीकडे तक्रार केली होती.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्या नजरेत ही फसवेगिरी आली असून ती सिद्ध झाल्यामुळे समितीने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी विशाल पोपट सपकाळे यांचे 'टोकरे कोळी' जमातीचे प्रमाणपत्र रद्द व जप्त केले आहे. राज्यात कोळी व सूर्यवंशी कोळी ह्या जाती विशेष मागास प्रवर्गामध्ये (एसबीसी) समाविष्ट आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जून १९९५ रोजी शासन निर्णयान्वये विशेष मागास प्रवर्गातील जातीसमुहाची यादी प्रकाशित केलेली असून अनुक्रमांक ४ वर कोळी तत्सम जातीसमुहाची वर्गवारी केलेली आहे, हे विशेष.जिल्हा पोलिस अधिक्षक करणार कारवाई

धुळे येथील जातपडताळणी समितीने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना संबंधिताने अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर सेवा प्रवेश मिळविल्यामुळे अधिनियम २००० च्या कलम १० व ११ नुसार कारवाई करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सिव्हिल अपिल क्र. ८९२८/२०१५ दि. ६ जुलै २०१७ कडे लक्ष वेधण्यात आले आहे.कोणत्याही जातीची उपजात लावण्याचा किंवा संबोधन करण्याचा कायदेशीर अधिकार फक्त भारतीय संसदेलाच आहे. त्याशिवाय अन्य कोणत्याही प्राधिकरणाला असा अर्थ लावण्याचा अधिकार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद कटवारे विरुद्ध राज्य शासन प्रकरणी निरीक्षण नोंदविले आहे. तसेच वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयात स्पष्ट केले आहे. - प्रफुल कोवे, जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम यवतमाळ.

टॅग्स :fraudधोकेबाजी