पुढाकार : क्रेडिट कार्ड, धनादेश, स्वॅपचा वापर अमरावती : पाचशे व हजारांच्या जुना नोटा चलनातून बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारात नागरिकांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली. यामध्ये अमरावतीकरसुद्धा मागे नसून पूर्वीचा २ ते ३ टक्के कॅशलेस व्यवहार आता ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावतीकरांना क्रेडिट कार्ड, धनादेश व स्वॅप मशिनद्वारे आर्थिक व्यवहार वाढविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरातील नागरिकांची ताराबंळ उडाली होती. नव्या पाचशे व दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्यानंतर हळूहळू सर्वांचेच आर्थिक व्यवहार सुरळीत झाले. बँका व एटीएम समोरील रांगामुळे नागरिकांना नाहक त्रास करावा लागला. मात्र, मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाचे बहुतांश नागरिकांनी स्वागतच केले. आता कॅशलेस व्यवहाराकडे नागरिकांनी आगेकुच केली आहे. त्यात अमरावतीकरांनीही पुढाकार घेतला.
जिल्ह्यातील कॅशलेस व्यवहार ११ टक्क्यांवर
By admin | Updated: December 25, 2016 00:10 IST