शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रकरण ; जंगल कामगार संस्थेची पडली दुसरी विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:07 IST

Amravati : गैरकायदेशीर आर्थिक व्यवहार; सचिव निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : मेळघाटातील जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सचिवांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रकरण पुढे आले होते. जिल्हा संघाने जारिदा येथील त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सचिवाला निलंबित केल्यानंतर इतर दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातील तारूबांदा जंगल कामगार सहकारी संस्थेचा सचिव सुदामा एस. मसागोले याला २४ ऑगस्टला निलंबित केले. संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात लोकमतने पूर्वीच वृत्त प्रकाशित केले होते.

तारूबांदा जंगल कामगार सहकारी संस्थेचा सचिव सुदामा एस. मसागोले याने सचिवपदावर असताना केलेले आर्थिक गैरव्यवहारबाबत निलंबनाची मागणी संस्थेचे उपाध्यक्ष व सभासदांनी जिल्हा संघाला तक्रार दिल्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती जिल्हा संघाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, त्याने कोणाबाबतही स्पष्टीकरण, खुलासा सादर केला नाही. याशिवाय कर्तव्यात वारंवार कसूर करीत त्याने संस्थेत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केला. अध्यक्ष रामसिंग जाधव यांनी सुदामा मसागोले याला निलंबित केले. त्याच्या संस्थेचा पदभार भवई संस्थेच्या सचिवाकडे देण्याचे आदेशात म्हटले आहे.

अजून काही रडारवर? मेळघाटातील जंगल कामगार सहकारी संस्थांमध्ये जंगल राज सुरू असल्याची वृत्तमालिकाच लोकमतने गत महिन्यात प्रकाशित केली होती. जिल्हा संघाने तक्रारीवरून चौकशीस आरंभ करण्यासाठी सचिवांना निलंबित केले असले तरी कोट्यवधी रुपयांचा निधी या संस्थांना मिळत असताना लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात संस्थांच्या सचिवांनी केल्याची चर्चा आता पुढे येत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती