शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बदलीप्रकरणी २२ शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 17:58 IST

अमरावती जिल्हा परिषदेविरूद्ध याचिका : पती-पत्नी एकत्रिकरणाचे निकष डावलले

अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेने २२ पती-पत्नी शिक्षकांच्या बदल्या करताना एकत्रिकरणाच्या नियमांना फाटा दिला. ही बाब अन्यायकारक असल्याप्रकरणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. सोमवारी याबाबत उच्च न्यायालयातून जिल्हा परिषद आणि शासनाला नोटीस बजावली जाणार आहे.

पती-पत्नी शिक्षक असलेल्या जोडप्यांना तीन वर्षांपर्यंत बदली करता येणार नाही, असा २८ मे २००५ चा शासन निर्णय आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पती-पत्नी एकत्रिकरणाची नियमवाली गुंडाळत ज्येष्ठतेच्या आधारे २२ शिक्षक जोडप्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात गतवर्षी बदली झालेल्या शिक्षक जोडप्यांचा समावेश आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांच्यावतीने अ‍ॅड. घारे, अ‍ॅड. देशपांडे यांनी शनिवारी नागपूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी दरम्यान शिक्षकांची बाजू मांडली. पती-पत्नी एकत्रिकरणात बदली झाल्यानंतर किमान तीन वर्षांपर्यंत बदली करता येत नाही. असे असताना अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २२ शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमांना फाटा देत बदल्या केल्या आहेत. यात काही शिक्षकांच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात बदल्या करण्याची किमया झाली आहे. दुसरीकडे १४ जून २०१९ रोजी राज्याच्या ग्राम विकास विभागाने सोलापूर, पुणे, सातारा जिल्हा परिषदेला पत्र पाठवून पती-पत्नी एकत्रिकरणानुसार ३० किमी. च्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवावी, असे कळविले आहे. 

शासन निर्णयानुसार एकाचीही सलग सेवा अथवा सोप्या क्षेत्रात १० वर्षे झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल, असे स्पष्ट नमूद आहे. असे असताना अमरावती जिल्हा परिषदेने २२ शिक्षकांच्या बदल्या करताना नियमावलीतून डावलल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

शिक्षकांसाठी पती-पत्नी एकत्रिकरणाची नियमावली आहे. तरीदेखील सेवा ज्येष्ठताचा आधार घेत २२ शिक्षक जोडप्यांवर अन्याय केला. जिल्हा परिषदेचा या निर्णयाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिक्षकांनी सार्वत्रिक याचिका दाखल केली आहे. सोमवारी याबाबत शासन अथवा जिल्हा परिषदेला नोटीस जारी करण्यात येईल.- राजेश सावरकर,राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक परिषद

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय