शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यशोमती ठाकूर कडाडल्या

By गणेश वासनिक | Updated: April 24, 2023 15:36 IST

खारघर येथील निष्पाप १४ श्रीसदस्यांचे मृत्युप्रकरण तापले

अमरावती : मुंबईच्या खारघर येथे १६ एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गौरविण्यात आले. मात्र, या सोहळ्यात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे १४ श्रीसदस्यांचा मूत्यू झाला. ही घटना गंभीर आणि मनाला वेदनादायी असून, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका राज्याच्या माजी महिला व बाल कल्याण मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार शहर, जिल्हा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबतची भूमिका मांडली. तर याबाबतचे निवेदन राज्यपाल रमेश बैस यांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांनी दिली. दरम्यान ॲड. यशेामती ठाकूर यांनी घारघर येथील शाही मेजवानीचे छायाचित्र दाखविताना ‘नेत्यांची एसीमध्ये शाही मेजवानी, तर श्रीसदस्यांनी भर उन्हात छावणी’ असे म्हणत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या घटनेत नेमके किती जणांचे मृत्यू झाले,याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी,अशी मागणी त्यांनी केली.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख नव्हे तर एक कोटी रूपयांची मदत करावी. कारण या साेहळ्याचा खर्च १३ कोटी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे श्रीसदस्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. श्रीसदस्यांसाठी ना पाणी, ना मंडप, ना औषधोपचाराचीसोय होती, अशी टीका त्यांनी केली.  

खारघर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्युप्रकरणी शिंदे, फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबीयांना न्याय प्रदान करावी, अशी भूमिका आमदार ॲड. ठाकूर यांनी मांडली. पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे जिल्हा बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुधाकर वानखडे, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास ईंगोले, भय्या पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस