शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

विद्यार्थिनीच्या मौनामुळे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:13 IST

स्थानिक दौ.सी. काळे विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या शाळाबाह्य प्रकरणात संबंधित विद्यार्थिनी अपहरण प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून सदर विद्यार्थिनीने पूर्णत: मौन बाळगले आहे. या प्रकरणात पालकांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, याप्रकरणी विद्यार्थिनीने मौन व स्वत:च्या वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार दिल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले.

ठळक मुद्देदौ.सी. काळे शाळेतील अपहरण प्रकरण : पोलिसांकडून आरोपीचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : स्थानिक दौ.सी. काळे विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या शाळाबाह्य प्रकरणात संबंधित विद्यार्थिनी अपहरण प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून सदर विद्यार्थिनीने पूर्णत: मौन बाळगले आहे. या प्रकरणात पालकांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, याप्रकरणी विद्यार्थिनीने मौन व स्वत:च्या वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार दिल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले.दौ.सी. काळे शाळेची घटक चाचणी १७ सप्टेंबर रोजी परीक्षा होती. मात्र, दोन विद्यार्थिनी शाळेत हजर नव्हती. यादरम्यान ती विद्यार्थिनी आणि तिची मैत्रिण शाळेचे शिक्षक संदेश काजळकर याच्या बोलावण्यावरून त्या शिक्षकाच्या मित्राच्या खोलीवर गेल्याची माहिती सोबत असलेल्या विद्यार्थिनीने पालकांना दिली. यावरून पालक व शाळेतील शिक्षक यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेत विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून भादंवि ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणातील आरोपी शिक्षक संदेश काजळकर हा मोर्शी येथील रहिवासी आहे. मग मित्राच्या खोलीवर या अल्पवयीन विद्यार्थिनीला बोलावण्याची कारण काय तसेच बोलावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर दोनपैकी एक विद्यार्थिनीला बाहेर ठेवून पीडित विद्यार्थिनीकडून दार बंद करून तब्बल ३० मिनिटे कोणता अभ्यास घेतला? सदर शिक्षक रजेवर असताना या विद्यर्थिनींना मित्राच्या खोलीवर बोलविण्याचे नेमके कारण काय? या शिक्षकाने एकाच मुलीचा अभ्यास का घेतला? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.याप्रकरणी खोलीबाहेर बसलेल्या दुसऱ्या विद्यर्थिनीने तिच्या आईला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यावरून पीडित मुलीच्या आईनेसुद्धा शाळेकडे धाव घेतली होती.पालकांची भूमिका संशयास्पदज्या त्वेषाने इतर पालक शाळेत दाखल झाले, तेवढा रोष संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करताना दिसून आला नाही. यावरून पीडित विद्यार्थिनीच्या पालकांचीसुद्धा भूमिका संशयास्पद वाटत आहे. आरोपी संदेश काजलकर हा अद्यापही पसार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.पीडितेची बालसुधारगृहात रवानगीसदर पीडित मुलीला अमरावती येथील बालसुधार समितीसमक्ष चौकशीकरिता पाठविण्यात आले आहे. या चौकशीतून मिळणाºया अहवालावरून पोलिसांना याप्रकरणी तपासाची नवी दिशा मिळणार आहे. प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अबदागिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजय आकरे करीत आहेत.सदर विद्यार्थिनीला अमरावती येथे महिला व बाल सुधार गृहात पाठविले आहे. या अहवालानंतर तपासाची दिशा ठरेल. आरोपी अद्यापही फरार असून, त्याचा शोध घेणे सुरू आहे.- ठाणेदार अजय आकरे, चांदूर बाजार पोलीस ठाणेसदर शिक्षकाबाबत प्राप्त तक्रारीनुसार हे कृत्य शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे सदर शिक्षकावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल.- प्रिया चौधरी, अध्यक्ष, दौ.सी. काळे विद्यालयसंबंधित शिक्षक रजेवर होता. दोन्ही मुली घटक चाचणीला अनुउपस्थित होत्या. याची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती देण्यात आली.- जयनंदा पुसदकर, पर्यवेक्षक