शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदे आढळल्यास ठाणेदार नियंत्रण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:44 IST

लोकसभा निवडणूक काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्न केले जाईल तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट (अहवाल) पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक : एसडीपीओंना कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्न केले जाईल तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट (अहवाल) पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.अमरावती ग्रामीण पोलीस दलात एकूण ३१ पोलीस स्टेशन व सात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येतात. लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात अवैध धंदे, दारूविक्री, मटका तसेच ज्या धंद्यापासून गावात तसेच शहरात तणाव, वाद निर्माण होतील, असे धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध व्यवसाय चालू करण्यास सहकार्य तसेच असे अवैध धंदे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या धाडसत्रात आढळून आल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्ष तसेच इतर पोलीस ठाण्यात पाठवून नवीन ठाणेदाराची नियुक्ती केली जाईल. त्या पोलीस ठाण्याशी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट पोलीस महासंचालकाला जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.मागील काही दिवसांपासून आजारी रजेवर असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर तात्काळ हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. गर्भवती महिला व जखमी पोलीस कर्मचारी यांचीसुद्धा यादी मागवली आहे. त्यांच्या रिक्त जागी नवीन कर्मचारी दिले जाणार आहेत.एलसीबीची मोठी कामगिरी नाहीमागील काही महिन्यांपासून अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई दिसून येत नाही. ग्रामीण भागातही खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत नवीन विशेष पथकात चांगल्या अधिकारी-कर्मचाºयाची नेमणूक करून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घातला जाईल.- दिलीप झळके, पोलीस अधीक्षक, अमरावती