लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरुन अमरावतीकडे जात असलेली एक भरधाव कार कारंजा घाडगेनजीकच्या सारवाडीजवळ अनियंत्रित होऊन उलटली. यात एका दहा महिन्याच्या चिमुकलीसह एका वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कारमध्ये एकूण आठ जण प्रवास करीत होते. ते सर्व नागपूर येथील आहेत.मैनाबाई दांडगे (११० वर्षे) व नभा इंगळे (१० महिने, रा.दोघीही नागपूर) यांचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला, तर उमा इंगळे, विशाल इंगळे, सवीर इंगळे, सोहली मानकर (२८), विनय मानकर, सुधा इंगळे (रा.सर्व गोरेवाडा, नागपूर) असे जखमींची नावे आहेत. एम.एच. ४० ए.आर. ३६६९ क्रमांकाच्या चारचाकीने आठजण अमरावतीला जात होते. मात्र, वाटेत भरधाव कार अनियंत्रित झाली. तीन कोलांट्या घेत ती रस्त्याच्या कडेला आदळली. त्यातील केवळ दहा महिन्यांची चिमुकली मुलगी जवळील विहिरीत पडली. काही युवकांनी त्या मुलीला विहिरीतून बाहेर काढत उपचारासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथून सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. यात उपचारादरम्यान चिमुकली व वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.भीषण अपघातात १०० फूट घासत गेली कारहा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर कार कोलांट्या घेत रस्त्याच्या कडेला १०० फूट घासत गेली. झाडाझुडूपात असलेल्या विहिरीजवळ आदळली. अपघातानंतर नजीकच्या पिंटू गोरे या हॉटेल चालकाने अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सुमारे ३५ किलोमीटर अंतर गाठत तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
राष्ट्रीय महामार्गावर कार उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST
एक भरधाव कार कारंजा घाडगेनजीकच्या सारवाडीजवळ अनियंत्रित होऊन उलटली. यात एका दहा महिन्याच्या चिमुकलीसह एका वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कारमध्ये एकूण आठ जण प्रवास करीत होते. ते सर्व नागपूर येथील आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर कार उलटली
ठळक मुद्देचिमुकलीसह वृद्धेचा मृत्यू : अपघाताचे प्रमाण वाढले