दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार
शिरखेड : दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता वरला फाटा ते आष्टगाव दरम्यान घडली. मृताचे वडील नामदेव महादेव नांदणे (कुरळपूर्णा) यांच्या तक्रारीवरून दुचाकी क्रमांक एमएच २७ एवाय ५८६१ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
उधारी मागण्यावरून पाईपने मारहाण
मोर्शी : उधारीचे ५०० रुपये मागण्यास गेलेल्या महिलेला दारूच्या नशेत शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आले. ही घटना स्थानिक शिवाजी कन्या शाळेजवळ २१ सप्टेंबर रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी चेतन गजानन विरुळकर, शुभम गजानन विरुळकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------
शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण
चांदूर बाजार : दारूच्या नशेत शिवीगाळ करीत असल्याने हटकले असता, तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना स्थानिक जयस्तंभ चौकात २१ सप्टेंबर रोजी घडली. योगेश नारायण राऊत याच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी जितेश भट्ट, अनिकेत शिरभाते, सापधारे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
काऊंटरवरून ६७०० रुपये चोरले
वनोजा बाग : दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेले ४३०० रुपये व साहित्य अज्ञाताने लंपास केल्याची घटना सातेगाव येथे २० सप्टेंबर रोजी घडली. सतीश श्रीराम लहाने (२८, रा. सातेगाव) यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
कार्यालयासमोर दुचाकी लंपास
दर्यापूर : येथील एका गॅस एजन्सी कार्यालयासमोर उभी केलेली एमएच २७ सीई ४३३७ क्रमांकाची अंदाजे २० रुपयांची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी उघड झाली. राजेश महादेव भारसाकळे (३५, रा. बनोसा) याच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.