शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अशोक आत्राम यांचा अप्पर आयुक्तांच्या खुर्चीवर कब्जा

By admin | Updated: May 31, 2015 00:01 IST

आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केल्यानंतर त्यांनी या ...

नियमित कामकाज : ‘स्टेटस्को’ च्या नावे शासन आदेश गुंडाळलाअमरावती: आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केल्यानंतर त्यांनी या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी प्रशासकीय लवादाकडे धाव घेत ‘स्टेटस्को’ मिळविला. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. पंरतू आत्राम यांनी शनिवारी एटीसींच्या खुर्चीवर बसून नियमित कामकाज करुन शासन आदेशाला हरताळ फासले आहे. १० जून रोजी यासंदर्भात उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.१६ आॅगस्ट २०१४ रोजी रुजू झालेले आदिवासी अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. ९ महिन्यातच बदली करण्यात आल्याने आत्राम यांनी शासन निर्णयाविरुद्ध ‘मॅट’ मध्ये धाव घेतली आहे. २००७ ते २०१५ या कार्यकाळात आठ ठिकाणी बदली करण्यात आल्याची बाब आत्राम यांना जिव्हारी लागली आहे. परंतु आत्राम यांची बदली करण्यात फार वेगळे कारण असल्याचे बोलले जात आहे. अशोक आत्राम यांच्या पत्नीने स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे तक्रार देवून त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याची चर्चा शनिवारी एटीसी कार्यालयात ऐकावयास मिळाली. पत्नीने पतीच्या बदलीसाठी थेट मंत्र्याकडे अर्ज दिल्याने ही बाब आदिवासी विकास विभागाच्या सचिवांनी गांभीर्याने घेत आत्राम यांची बदली करुन सहायक उपायुक्त महादेव राघोर्ते यांच्याकडे पदभार देण्याचे आदेश काढले होते. हे अप्पर आयुक्त कार्यालय हे दोन दिवसातील झालेल्या नाट्यमय घडामोडींनी चांगलेच चर्चेत आले आहे.आदिवासी समाजाला न्याय मिळावा, यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाची निमिर्ती केली आहे. परंतु या विभागात आदिवासींचा विकास करण्याऐवजी अधिकारी मलिदा खाण्यातच मश्गूल राहतात, अशा तक्रारी आहेत. आत्राम यांची बदली झाली असेल तर त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष अधिकारी या विभागात आले पाहिजे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु.- प्रवीण पोटेपालकमंत्री, अमरावती.अशोक आत्राम यांच्यासंदर्भात फोनवरुन माहिती जाणून घेतली आहे. एटीसी कार्यालयात हल्ली सुरु असलेल्या वस्तुस्थितीची माहिती मेलद्वारे मागविली आहे. एकतर्फा पदभार स्वीकारण्यात आल्याने अप्पर आयुक्तपदी राघोर्ते हेच आहेत. आत्राम यांच्याविषयी गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. सर्व बाबी सचिवांना अवगत करण्यात आल्या आहेत.- सु. ना. शिंदेउपसचिव, आदिवासी विकास विभागबदली झाली याला विरोध नाही. परंतु कोणत्या कारणास्तव बदली केली, हे कळले पाहिजे. मी काही आदिवासी विभागात चोरी केली नाही अथवा दरोडा घातला नाही. एटीसी म्हणून माझी नियुक्ती ही प्रतिनियुक्तीवर असली तरी बदली करायची असल्यास तीन महिने अगोदर नोटीस देणे अपेक्षित आहे. पदभार सोडला नसल्याने अप्पर आयुक्तपदी कायम आहे.- अशोक आत्रामअप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभागबदल्यांच्या फाईलींवर स्वाक्षरींची स्पर्धाआदिवासी विकास विभागातंर्गत अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. १३ जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एटीसी कार्यालयातून होणार आहे. बदल्यांमध्ये होणाऱ्या फिक्सींगचा मलिदा चाखण्यासाठी फाईलींवर स्वाक्षरीची स्पर्धा सुरु झाली आहे. या फाईलींवर आत्राम अथाव राघोर्ते यापैकी स्वाक्षरी कोणाची? याकडे लक्ष लागले आहे