शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

११४ उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:01 IST

नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला.

ठळक मुद्देविधानसभा २०१४ ची स्थिती : आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी फक्त २१ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित ११४ म्हणजेच ८५ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. यामध्ये राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला. या ठिकाणी १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमावावी लागली.बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २९,६४६ मतांचा कोटा फक्त रवि राणा, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय, काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनाच पूर्ण करता आला. या मतदारसंघात ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अमरावती मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनामत रक्कम वाचविण्यासाठी २६,७११ मतांचा कोटा फक्त भाजपाचे सुनील देशमुख व काँग्रेसचे रावसाहेब शेखावत पूर्ण करू शकले. या ठिकाणी १८ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही.मोर्शी मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३०,६४४ मतांची आवश्यकता होती. मात्र, भाजपचे अनिल बोंडे व राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. मेळघाट मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे प्रभुदास भिलावेकर, काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल हेच आवश्यक २८,६८८ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. अन्य तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.अचलपूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बच्चू कडू व भाजपचे अशोक बनसोड आवश्यक २९,८१९ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तिवसा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी (दिघडे) व शिवसेनेचे दिनेश वानखडे हे उमेदवार अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २८,१७४ मतांचा कोटा पूर्ण करु शकले. उर्वरित १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दर्यापूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे रमेश बुंदिले, शिवसेनेचे अभिजित अडसुळ व रिपाइंचे बळवंत वानखडे आवश्यक ३०,३२५ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित उमेदवारांची अनामत शासनजमा झाली.अनामत रकमेसाठी असे आहे गुणोत्तरराजकारणात स्पर्धक किंवा विरोधकाचा उल्लेख करताना अनेकदा ‘डिपॉझिटही वाचले नाही’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. अनामत रक्कम जप्त झाली म्हणजे नेमके काय झाले, असा प्रश्न कुतूहलाने विचारला जातो. एकूण वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. यामध्ये नोटाला मिळालेली मते गृहीत धरले जात नाहीत.१०.४५ लाख रक्कम शासनाकडे जमाविधानसभेसाठी सर्वसाधारण मतदारसंघात १० हजार व राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असते. २०१४ च्या निवडणुकीत ११४ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. राखीव असलेल्या मेळघाट व दर्यापूरमध्ये १९ उमेदवारांचे ९५ हजार व अन्य सहा मतदारसंघांत ९५ उमेदवारांचे ९.५० लाख अशी एकूण १०.४५ लाख रुपयांची अनामत रक्कम शासनजमा झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019