शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

दरपत्रकांचा ताळमेळ जुळवताना उमेदवारांची कसरत

By admin | Updated: October 5, 2014 22:57 IST

निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी २८ लाख रूपयांची मर्यादा घालून दिली आहे. साधारणपणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला प्रचारादरम्यान येणाऱ्या सर्व खर्चाचे दरपत्रक

अमरावती : निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी २८ लाख रूपयांची मर्यादा घालून दिली आहे. साधारणपणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला प्रचारादरम्यान येणाऱ्या सर्व खर्चाचे दरपत्रक स्थानिक बाजारभावानुसार निश्चित केले आहे. तसेच खर्चचे विवरण एक दिवसआड बाबीनिहाय सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. मात्र आयोगाचे दरपत्रकासह खर्चाचा ताळमेळ जुळवताना उमेदवारांची दमछाक होत आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करायच्या दिवसापासून मतदानाच्या तारखेपर्यंत दररोज होणारा खर्च सादर करण्याचे बंधनकारक आहे. यासाठी खर्चाची विहीत मर्यादा आहे. खर्च सादर न झाल्यास किंवा आयोगाच्या दरपत्रकान्वये खर्चाचा ताळमेळ न जुळल्यास किंवा खर्च सादर करण्यास दिरंगाई झाल्यास कारवाई करण्यात येते. या खर्चाची तपासणी करण्यासाठी विशेष कक्ष व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी एक खर्च निरीक्षकाची नियुक्ती आयोगाने केली आहे. खर्च निरीक्षक एका मतदारसंघात तीन वेळा तपासणी करणार आहेत. प्रचारासाठी एक आठवड्यांचा कालावधी उरला आहे. प्रचाराचा ज्वर आठही मतदारसंघांत चढला आहे. असह्य उकाड्यानंतर जसजसा अंधार होतो तसतसी प्रचाराची रंगत वाढत जाते. बार, ढाबे, खानावळी, हॉटेल गजबजून जातात. प्रत्येक मोठ्या प्रचार कार्यालयाच्या क्षेत्रात बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. या भोजनावळी विनापरवाना व निवडणूक विभागाला कानोखबर लागणार नाही याची दक्षता घेत सुरू आहेत. याचाही आता खर्च निरीक्षक मागोवा घेणार आहेत. उमेदवारांना खर्च करण्यासाठी आयोगाद्वारा आता दरपत्रक जारी करण्यात आले आहेत. प्रचार वाहनांचे प्रकार त्यांचे दरदिवसी दर, ध्वनीक्षेपक, मंडळ, स्टेज, छपाई, प्रचार साहित्य, चहा, कॉफी, शाकाहारी व मांसाहारी भोजन आदींची दरसूची जारी केली आहे व त्यानुसारच या निवडणुकीत उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे. आयोगाचे दर व खर्चाची मर्यादा यामध्ये उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.