शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुन्हा परतू शकतो नरभक्षी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:07 IST

सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.अमरावती जिल्ह्यातून पुढे मध्य प्रदेशच्या आठनेर रेंजमधील सातपुडा पर्वतरांगांतील पलासपानी जंगलात नरभक्षक वाघ शिरल्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी त्याने सकाळी ९ वाजता दोन गार्इंवर हल्ला केला. दोघींच्या मानेवर त्याच्याकडून गंभीर जखमा झाल्या. गुराख्याने आरडाओरड करताच त्याने जंगलात पळ काढला. रात्री ८ वाजता लाल रंगाच्या गाईवर हल्ला चढविताना ट्रॅप कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपले. त्यामुळे तो तीन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या जंगलातच असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात तो आहे. त्याची आतापर्यंत एकाच, उत्तर दिशेने वाटचाल पाहता, परतण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान, मेळघाटच्या जंगलात वाघ परतण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक विशाल माळी यांनी वर्तविला. दुसरीकडे आठनेर रेंजमधील पलासपानी वनखंड ६४५ मध्ये दोन ते तीन वाघ असल्याने हा युवा वाघ आपला स्वतंत्र एरिया तयार करून तिथे स्थिरावण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले, तर अनुकूलता न लाभल्यास वाघाची दिशा बदलू शकते, असे आरएफओ शंकर बारखडे यांनी सांगितले. मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे वनकर्मचारी वनअधिकारी दररोज त्याचे लोकेशन घेत आहेत.वाघ दोन ते अडीच वर्षाचाचंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलात २०१६ मध्ये जन्मलेल्या वाघाचे वय सध्या दोन ते अडीच वर्षे आहे.वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरेअमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाऱ्यांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरेअमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाºयांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Tigerवाघ