शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मागितली भाकरी, मिळाली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:36 IST

पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.'जंगलात गेलो तर गोड बोलून परत आणतात. पुन्हा विसरून जातात. आता तिसऱ्यांदा गेलो आश्वासने सोडून. प्रत्यक्षात शेतजमीन व दीड लक्ष रुपये मिळाल्याशिवाय उठायचे नाही, असा ठाम निर्धार केला ते तर मिळालेच नाही. मात्र, वनाधिकाऱ्यांनी आम्हाला बळजबरीने काढण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या आमच्यावर फोडल्या. आमच्या दुचाकी जाळल्या. सामानाची तोडफोड केली. अन्नधान्यांची नासधूस केली. महिला पुरुषांना झोडपून काढले आणि यातूनच संघर्ष उडाला. यात आमचा दोष काय, हे आम्हाला सांगा आम्ही जगायचे कसे? गावातील दहा एकर जमीन असताना इथे इंचभर जमिनीचा तुकडा नाही, खायचे काय, जगायचे कसे, या विवंचनेत आम्ही आठ गावांतील पुनर्वसित आदिवासी कसेबसे दिवस काढत आहोत. त्यात तीनशेवर आदिवासी युवक, वृद्धांचा मृत्यू या सहा वर्षांत झाला. संपूर्ण पिढीच आमची नष्ट करण्याचा हा डाव शासनाने रचला आहे. किती सहायचे आम्ही? आता आमचा हक्क घेऊनच राहू, यासाठीच आम्ही उर्वरित जीवन कंठत असल्याचे चंपालाल लाभू बेठेकरसह गंगा कासदेकर फुलकली आदी महिलांनी बुधवारी अमोना कासोद या गावी आपल्या व्यथा 'लोकमत'जवळ मांडल्या. पुनर्वसन दरम्यान आमच्या बँकेतील खात्यात टाकलेल्या दहा लक्ष रुपयातून हातपंप नाल्या रस्ते आदी मूलभूत सुविधा करून देण्यात येणार असा कुठल्याच प्रकारचा निर्णय आम्हाला सांगण्यात आला नव्हता त्या पैशातूनच सर्व पुनर्वसनाच्या सोयीसुविधा देण्यात आल्या त्यामुळे आमच्या पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला त्या दहा लक्ष रुपयातून शेती किंवा इतर काही घेण्याची आमची उमेद होती मात्र शासनाच्या निर्णयाचे बसत नसल्याने आम्ही मूलभूत सुविधा व शेतीचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला मागील तीन वर्षांपासून आम्हाला केवळ भूलथापाच दिल्याचे त्या म्हणाल्या.हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेधमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकाºयांवर केलेल्या हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेध करण्यात आला. असामाजिक घटकांकडून झालेल्या या हल्ल्यात कर्तव्यावरील वनाधिकारी, वनकर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेत. या खुनी हल्ल्यात काही गंभीर झालेत. यावर त्यांनी खेद, दु:ख व्यक्त केले. हल्लेखोरांवर, असामाजिक घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयएफएस असोसिएशनकडून करण्यात आली आहे.लाठीमार केला अन् संघर्षाला सुरुवात झालीजंगलात मंगळवारी आदिवासींचा वनविभाग व पोलीस कर्मचाºयांशी संघर्ष झाल्यानंतर मिळेल त्या जंगलातील रस्त्याने महिला-पुरुष पळत सुटले. पुढे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी होते. त्यांच्या मागे संरक्षणासाठी पोलीस, सीआरपीएफचे जवान होते. वनविभागाने आदिवासींची वाहने पेटविली. लाठीहल्ला केला. धान्याची नासधूस करून जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जंगलात आदिवासी सैरावैरा पळत होते. रात्री २ वाजता अमोना कासोद गावी आले. २० पेक्षा अधिक महिला, पुरुष जखमी झालेत. चंपालाल बेठेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जंगलात तो पडून होता. त्याने जीव मुठीत घेऊन कसाबसा पळ काढला. सहकाऱ्यांनी अंगावर गवत टाकून त्याला लपविले. सर्व शांत झाल्यावर एक किमीपर्यंत त्याला फरफटत नेले. काही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.आदिवासींनीच केला हल्लाजंगलातून बाहेर पुनर्वसित गावी चला, अशा विनवण्या आदिवासींना वारंवार करण्यात आल्या. मंगळवारीसुद्धा तेच सुरू असताना अचानक वनकर्मचारी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून धारदार कुºहाड व शस्त्रांनी हल्ला चढविला. गोफणीने दगड भिरकावले. त्यात सीआरपीएफच्या जवानांकडे असलेल्या सुरक्षा जाळी तुटल्या. अधिकारी-कर्मचारी जीव मुठीत घेऊन जंगलातून पळत सुटले. समजावण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने हा संपूर्ण ताफा परत जात असताना हा हल्ला झाल्याचे चिखलदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आकाश शिंदे व तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले.