शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाची राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:01 IST

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवडणुकीत मतांसाठी भाजपने केवळ आश्वासन दिले. प्रत्यक्ष काहीही केले नाही. त्यामुळे धनगर समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची अपेक्षा आहे, हा सूर अमरावती येथे आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत उमटला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे. त्यामुळे समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याचे सांगत या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, प्रवक्ते तथा आयोजक दिलीप एडतकर, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार उपस्थित होते.धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाचे सर्वसमावेशक सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व मंडळी सोबत असल्याची ग्वाही मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यकर्ता परिषदेला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाची सबुरी संपत आहेपरिषदेला संबोधित करताना माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले, शिर्डी येथे काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी या ठिकाणी श्रद्धा, सबुरी असे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २०१४ मध्ये भाजपने आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्षात काहीच मिळाले नाही. त्यामुळे आता धनगर समाजाची सबुरी संपत आली आहे. गत निवडणुकीत भाजपने दिलेला ‘सबका साथ सबका विकास’चा नारा मतदारांच्या पचनी पडला. मात्र, देशात आता लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडून काय चालले आहे, हे पाहतच आहात. त्यामुळे आता धनगर समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन सुनील देशमुख यांनी यावेळी केले.  

चुकीच्या व्यवस्थेमुळे न्याय मागण्याची वेळ : पटाेलेधनगर समाज हा मागणारा नाही, देणारा समाज होता. मात्र, सध्या देशात चुकीच्या व्यवस्थेमुळे या समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागत आहे. भाजपने आश्वासन न पाळता केवळ मते घेतली. आम्ही लोकशाही मार्गाने व संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. याच मार्गाने धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  दिले.

राजस्थानमध्ये सबसिडी, मग येथेही द्यावी : देसाईधनगर समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या, गाई, म्हशी पाळणे हा आहे. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या या समाजाला आरक्षण तर मिळायला हवेच, याशिवाय राजस्थान सरकारकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर पाच टक्के सबसिडी दिली जाते. ती महाराष्ट्र सरकारनेही देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी केली.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरDhangar Reservationधनगर आरक्षण