शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सीटी स्कॅनसाठी कॉल... अपघातग्रस्ताची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:07 IST

डोक्याला मार लागल्याने सीटी स्कॅनसाठी परिचारिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला कॉल केला. मात्र, अर्ध्या तासापर्यंत सीटी स्कॅन न झाल्याने तो तरुण मृत्यूशी झुंज देत होता. जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा वाहणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हा जीवघेणा प्रकार रविवारी उघडकीस आला.

ठळक मुद्देइर्विनमधील कारभार : अर्जुननगर चौकात चारचाकीवर दुचाकीस्वार धडकला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डोक्याला मार लागल्याने सीटी स्कॅनसाठी परिचारिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला कॉल केला. मात्र, अर्ध्या तासापर्यंत सीटी स्कॅन न झाल्याने तो तरुण मृत्यूशी झुंज देत होता. जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा वाहणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हा जीवघेणा प्रकार रविवारी उघडकीस आला.शहरातील अर्जुननगर चौकात दुपारी अडीच वाजता वळण घेणाºया चारचाकीवर दुचाकीस्वार धडकला. अर्जुननगरातील रहिवासी रोहित हेमंत मुखरे (२६) आपल्या कुटुंबीयांना घेऊन रविवारी दुपारी २.३० वाजता एमएच २७ बीई ८४६० क्रमांकाच्या चारचाकीने अर्जुननगराकडे वळण घेत होता. त्याचवेळी पंचवटी चौकाकडून नागपूर रोडकडे मनोज रमेश मेश्राम (२७) एमएच २७ बीयू ५७७३ क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव निघाला होता. थोड्याशा दुर्लक्षामुळे क्षणातच मनोजची दुचाकी चारचाकीला मागून धडकली. या अपघातात हा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, त्या मार्गाने जाणाºया शुभम थोरात (रा. वडगाव माहुरे) या तरुणाने माणुसकी म्हणून मदतीचा हात देत मनोजला इर्विन रुग्णालयात आणले.तत्पूर्वी, अमरावतीवरून वडगाव माहुरेकडे त्याच मार्गाने दुचाकीवर बहिणीला बसून घेऊन जाणाºया शुभम थोरातचे लक्ष बघ्यांची गर्दीवर गेले. काय झाले अन काय नाही, ही उत्सुकता असताना तो लगेच थांबला आणि त्याचे लक्ष रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीकडे गेले. त्याला कोणी उचलून रुग्णालयात नेत नसल्याचे पाहून शुभमचे मन हळहळले. आपण यापूर्वी अनेक अपघातग्रस्तांना मदत केल्याची आठवण शुभमला झाली आणि त्याने लगेच जखमी मनोजला उचलून रुग्णालयात नेण्याची तयारी दर्शविली. आॅटोरिक्षा थांबविण्याचे प्रयत्न केले, मात्र, जखमीला रुग्णालयात न्यायला कोणी तयार नव्हते. अखेर एक आॅटोचालक तयार झाला आणि शुभमने आपल्या बहिणीला अर्जुननगर चौकात थांबवून जखमी मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरु झाले. मात्र, त्यानंतरही सीटी स्कॅन आणि न्यूरोसर्जनसाठी घोडे अडले होते.ओळख पटविणे झाले होते कठीणअपघातानंतर जखमीची ओळख पटविण्याचा पेच पोलिसांना पडला होता. जखमीचा मोबाइलसुद्धा गहाळ झाला होता. दरम्यान, शुभम थोरात याने परिचयातील व्यक्तींना कॉल करून जखमीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर इर्विन चौकातील पोलीस कर्मचारी गवई यांनी मनोजच्या बहिणीशी संवाद साधून त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले.नियमित वेळेत सीटी स्कॅनसाठी कर्मचारी असतात. सुट्टी किवा अवेळी रुग्ण आल्यास आॅन कॉल ड्युटी असते. कॉल करून सीटी स्कॅन करणाºयांना बोलाविले जाते.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक