शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चिखलदऱ्यात साकारणार ‘कॅक्टस्’ गार्डन

By admin | Updated: July 29, 2015 00:24 IST

मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा सर्वांना लाभ घेता यावा, पर्यटन वाढीसाठी चिखलदरा येथे कॅक्ट्स गार्डन ...

पालकमंत्री पोटे : पक्षिमित्र वृक्षांचीही लागवड करणारअमरावती : मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा सर्वांना लाभ घेता यावा, पर्यटन वाढीसाठी चिखलदरा येथे कॅक्ट्स गार्डन (निवडुंग उद्यान) व पक्षी मित्र वृक्ष योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.मेळघाटमध्ये इको टुरिझम वाढविणे, वनक्षेत्र वाढविणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणा संदर्भात येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात जिल्ह्यातील वन्यजीव विभाग व उपवनसंरक्षकांची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, नागपूर येथील राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर, मेळघाट व्याघचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, उमेश वर्मा, धारणीचे उपवनसंरक्षक मनीष कुमार, अमरावतीचे उपवनंसरक्षक निनू सोमराज, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, सहायक वनसंरक्षक मोरनकर, चिखलदरा परिसर विकास समितीचे संयोजक उल्हास मराठे, श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.मेळघाटात सुमारे २५६ विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी आहेत. ३६ प्रकारचे कॅकट्स आहेत. दुर्मीळ अशा अनेक वनस्पतींची जणुके मेळघाटातच आहेत. त्याचा लाभ निसर्गप्रेमींना, पर्यटनप्रेमींना व्हावा यासाठी चिखलदरा परिसर विकास समितीचे संयोजक उल्हास मराठे यांनी पालकमंत्र्यांपुढे चिखलदरा येथील वन विभागात कॅकट्स गार्डन व पक्षिमित्र वृक्ष योजनेची संकल्पना मांडली. यासाठी सुमारे २० लाखांचा खर्च येणार असून ती देण्याची व्यवस्था आपण करु, असे आश्वासन पालकमंत्री पोटे यांनी दिले. कॅकट्स गार्डनमध्ये सुमारे १७५० विविध प्रकारचे कॅकट्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये शोभेची व औषधी, जंगलात सापडणारे कॅक्ट्स (निवडुंग) चा समावेश राहील. पर्यटकांना येथील दुर्मीळ पक्ष्यांची माहिती व्हावी म्हणून चिखलदरा बसस्थानकालगतच्या जागेत पक्षिमित्र वृक्ष संकल्पना राबवीत आहे. मोठे कृत्रिम सिमेंटचे झाड उभारुन त्यावर मेळघाटातील दुर्मीळ पक्ष्यांची प्रतिकृती व त्यांची घरटी तयार करण्यात येईल. या संकल्पनेतून मेळघाटातील दुर्मीळ पक्षी, कॅकट्स व लोप पावत असलेल्या दुर्मीळ वनस्पतींचे जतन होण्यास मदत होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना दुर्मीळ निसर्ग ठेवा पाहण्यास मिळणार आहे.वडाळी वनपरिक्षेत्रातील सुमारे ४० हेक्टरवर पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने ना. पोटे यांनी चर्चा केली. व्याघ्र पत्रिकेचे संपादक श्याम देशपांडे यांनी संकल्पना राबविण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.