शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

अचलपूर-परतवाड्यात कॅबला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

अचलपूर शहरातील चौधरी मैदानावरून आणि परतवाडा शहरातील मुगलाईतपुरा बैतुल स्टॉप-गुजरीबाजार येथून सकाळी ११ वाजता या मुक मोर्चास सुरुवात झाली. २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. विविध संघटनांच्या निवडक प्रतिनिधींतर्फे एकत्रितपणे अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमुस्लिम बांधव एकवटले : दंगा नियंत्रण पथकासह शस्त्रधारी पोलीस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा-अचलपूर : अचलपूर- परतवाडा शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मुकमोर्चाद्वारे सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध दर्शविला. यात हा कायदा रद्द करण्याची मागणी पुढे करीत अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले. अचलपूर शहरातील चौधरी मैदानावरून आणि परतवाडा शहरातील मुगलाईतपुरा बैतुल स्टॉप-गुजरीबाजार येथून सकाळी ११ वाजता या मुक मोर्चास सुरुवात झाली. २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. विविध संघटनांच्या निवडक प्रतिनिधींतर्फे एकत्रितपणे अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांना निवेदन देण्यात आले.अचलपूरचे काजी सैय्यद ग्यासोद्दीन, जमाते इस्लामी हिंदचे मो. कबीर हनफी, तब्लिक जमातचे प्रतिनिधी मौलवी मुजाहिद कासीम, गरिब नवाज परतवाड्याचे इमाम व खतीब मकसूद रजा, रयतचे राहुल कडू, भारत मुक्ती मोर्चाचे अजय नन्नावरे, बुद्धिष्ट इंटरनॅशनल फोरमचे कौतिककर, संभाजी ब्रिगेडचे मंगेश मालठाणे, इरफान हाजी, डॉ. अनिल काजी हाफेज, सैफुलबारी, काजी बलिगोद्दीन गाजी, जमील सर, शमशेरखान, पठाण, नगरसेवक सल्लूभाई, माजी नगरसेवक साजिद फुलारी, मो आबीद हुसेन, हाजी हफीज, समाजसेवक एहतेशाम नबील, हाजी रफीक सेठ, असलम बंजारा, मस्तान कुरेशीसह अनेक मुस्लिम नेत्यांच्या नेतृत्वात हा मुकमोर्चा शांततेत पार पडला.दंगा नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या, राखीव पोलीस, हेल्मेटधारी पोलिसांसह बंदुकधारी पोलिसही शहरात तैनात करण्यात आले होते. क्युआरटी पथकाची एक तुकडी एसडीपीओ व एसडीओ कार्यालयावर तैनात होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र