शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

१२५ ग्रामपंचायतीत जूनमध्ये पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:39 IST

जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागातील रिक्त असलेल्या १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. २२ मे रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे, तर २३ जूनला मतदान होईल. संबंधित निवडणूक क्षेत्रात २४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झालेली आहे.

ठळक मुद्दे२४ जूनपर्यंत आचारसंहिता : आयोगाचा कार्यक्रम, ३१ मेपासून उमेदवारी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागातील रिक्त असलेल्या १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. २२ मे रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे, तर २३ जूनला मतदान होईल. संबंधित निवडणूक क्षेत्रात २४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू झालेली आहे.जुलै ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व तसेच रिक्त सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यात या कालावधीत एकाही ग्रामपंचायतीची मुदत संपत नसली तरी रिक्त सदस्यपदे असल्याने जिल्हा निवडणूक विभागाने या विषयीचा अहवाल आयोगाला सादर केला होता. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात आला. सोमवारी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारी राज्य निवडणूक आयोगाद्वारे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आॅनलाइन राहणार आहे. निवडणुकीचे नियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. २३ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची प्रक्रिया राहील. २४ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार तालुक्याच्या मुख्यालयी मतमोजणीचे ठिकाण व वेळ निश्चित करणार आहेत.दोन महिन्यांपासून लागू असलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारी संपुष्टात येत असतानाच जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना पुन्हा खीळ बसणार आहे.उमेदवारी अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यकउमेदवाराना संगणकीय प्रणालीद्वारेच उमेदवारी अर्ज भरावा लागेल. उमेदवारी अर्ज दाखळ करतेवेळी उमेदवारी अर्ज, मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र, आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती, जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागतील