शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टोकनच्या चार लाख क्विंटल तुरीची शासन खरेदी

By admin | Updated: July 7, 2017 00:27 IST

केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा : १८ हजार शेतकऱ्यांना शासनादेशाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे टोकन दिलेल्या किमान १८ हजार ६४५ शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर घरी पडून होती. मात्र शासनाद्वारा ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे यंदाच्या खरिपात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १० मे पासुन पीएसएस योजनेव्दारा तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र केंद्र शानाने निर्धारीत केलेला कोट्याची तूर २६ मे रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली.त्यामुळे विहीत कालावधीत राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात आली. व बाजार समित्यांच्या आवारात उघड्यावर परंतू टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही मुदत देखील १० जून रोजी संपल्याने ज्या केंद्रावर तूर खरेदी व मोजणी बाकी होती.त्या तुरीची प्रथम खरेदी करण्यात आली.मात्र टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या खरेदी विषयी कोणतेच आदेश नसल्याने खरीपाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले होते.आता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी १०जून पर्यत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर येत्या दोन दिवसात खरेदी करण्यात येईल असे अस्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदी ४यंदाचा खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत आहे, हे हेरून हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रूपये कमी भावाने व्यापाऱ्यांद्वारा तुरीची खरेदी करण्यात आली.काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर टोकन घेतल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी तूर शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. अशी आहे तूर खरेदी बाकी ४जिल्ह्यात सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती केंद्रावर ३,६५० शेतकऱ्यांची १,२,४६९, अंजनगाव केंद्रावर २,१४९ शेतकऱ्यांची ३५,६०७ चांदूरबाजार केंद्रावर १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वे केंद्रावर १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२ दर्यापूर केंद्रावर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव केंद्रावर ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३ मोर्शी केंद्रावर १,९१५ शेतकऱ्यांची ३८,९३१, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर १७९२ शेतकऱ्यांची ३४,३४४, तिवसा केंद्रावर ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३, व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तुरीची खरेदी व मोजणी व्हायची आहे. ४७ हजार शेतकऱ्यांची ९.५७ लाख क्विंटल तूर खरेदी ४जिल्ह्यात १० जून पर्यत ४७ हजार ९७६ शेतकऱ्यांची नऊ लाख ५७ हजार २६५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांद्वारा ३६ हजार ८१३ शेतकऱ्यांची सात लाख ३२ हजार २५५ क्विंटल, व्हीसीएमएफ द्वारा १० हजार ७६० शेतकऱ्यांची दोन लाख २० हजार ५४७ क्विंटल, आदिवासी विकास महामंडळाद्वारा ४०० शेतकऱ्यांची चार हजार ४६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.