वेगवाग हालचाली : दोन हजार किमी अंतरामागे दरदिवशी १० हजार रुपये बुडणार अमरावती : महापालिका प्रशासनाने अंबानगरीवासियांच्या सेवेत दिड महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या स्टार बस सेवेच्या कंत्राटदारांनी अटी, शर्थीला छेद देण्याचा प्रकार चालविला आहे. बस फेऱ्या कमी होत असल्याचे कारण पुढे करुन दरदिवसाला दोन हजार किमी अंतर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेला दरदिवशी १० हजार रुपयांच्या रॉयल्टीपासून मुकावे लागणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या निर्णयार्थ असून याविषयी कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागला आहे. तत्कालीन आयुक्त चंद्र्रकांत गुडेवार यांनी पृथ्वी टुर्स अॅन्ड ट्रॅव्हर्ल्स नामक कंत्राटदाराला स्टार बस सेवेचा कंत्राट प्रतिकिलो मिटर ५ रुपये १० पैसे दराने सोपविण्यात होता. अटी, शर्थीनुसार दरदिवशी ७,७०० कि.मी. अंतर बस सेवेची रॉयल्टी महापालिका प्रशासनाला देणे अनिवार्य असल्याचा करारनामा करण्यात आला. त्यानुसार २४ मेपासून स्टार बस सेवेचा मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात आला. परंतु महानगरात वाहतूक कोंडी, बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचे सुरु असलेले बांधकाम, वाहक व चालकांची विश्रांती आदी तांत्रिक कारणे पुढे करुन बस फेऱ्या कमी होत आहे. त्याकरिता प्रत्येक दिवसांचे दोन हजार कि. मी. अंतर कमी करावे, असा प्रस्ताव कंत्राटदारांनी ठेवला आहे. करारनाम्यात असलेल्या अटी, शर्थीनुसार किमीप्रमाणे कंत्राटदारांनी रॉयल्टीची रक्कम भरणे अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम वसूल करण्यात महापालिका कुचराई करीत असल्याचे वास्तव आहे. ३० लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस पृथ्वी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हर्ल्सकडे थकीत असलेल्या ३० लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अजुनही ही रक्कम सदर कंत्राटदारांनी अदा केली नसल्याची माहिती आहे. बस सेवेच्या कंत्राटदाराला प्रशासनाकडून झुकते माप दिले जात असल्याचा आक्षेप आहे. पृथ्वी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हर्ल्सने प्रवासाचे अंतर कमी करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच रॉयल्टीची रक्कम वसूल होईल. ‘नो- चेंज’ अशीच भूमिका राहील. करारनाम्यानुसारच बससेवेचा कारभार चालेल. - हेमंत पवार, आयुक्त, महापालिका. बस सेवेचे प्रवास अंतर कमी करण्याचा प्रस्ताव अद्यापपर्यत आला नाही. परंतु असा प्रस्ताव येणार असल्याचे ऐकिवात आहे. जवळपास १५०० किमी अंतर कमी करण्याचा प्रस्तावाचे संकेत आहे. महिन्याकाठी एक लाख रुपयांच्या रॉयल्टीने नुकसान होऊ शकते. - अविनाश मार्डीकर, सभापती, स्थायी
बस सेवेची रॉयल्टी कमी करण्याचा घाट ?
By admin | Updated: July 14, 2016 00:20 IST