शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

घरगुती सिलिंडरमधून गॅस भरताना पेटली मारुती व्हॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 21:10 IST

स्थानिक एन.टी.आर. शाळेच्या मार्गावर छुप्या मार्गाने मारुती व्हॅनमध्ये घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना वाहनाने पेट घेतला

वरूड (अमरावती) : स्थानिक एन.टी.आर. शाळेच्या मार्गावर छुप्या मार्गाने मारुती व्हॅनमध्ये घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना वाहनाने पेट घेतला. आगीत या वाहनाची राखरांगोळी झाली. शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. जायन्ट्स चौकातून एन.टी.आर. शाळेकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या एका मोटार गॅरेजसमोरील रिकाम्या जागेत शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता एमएच १९ एई ४८६३ या मारुती व्हॅनच्या टाकीत छुप्या मार्गाने घरगुती सिलिंडरमधून गॅस भरणे सुरू होते. काही युवक आणि एक लहान बालकसुद्धा वाहनाजवळ उभे होते. काही क्षणातच मारुती व्हॅनमधून आगीचे लोळ निघू लागले. नागरिकांनी सतर्कता बाळगून आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. वरुड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हा प्रकार आदित्य टायर्सच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाला आहे. वाहनाने पेट घेताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा तपास ठाणेदार गोरख दिवे, सहायक पोलीस निरीक्षक गट्टे, जमादार दिलीप वासनकरसह वरुड पोलीस करीत आहेत.