लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगस्थळी सोमवारी ११.१५ च्या सुमारास एका कारला अचानक आग लागली. अभियोक्ता बाळासाहेब गंदे यांची कार क्रमांक एमएच २७ एआर-२६१३ ने अचानक पेट घेतल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दोन कर्मचाऱ्यांना कॅन्टीनवरून दिसले. त्यांच्या तत्परतेने आजुबाजूला असलेली १० वाहने आगीच्या संकटातून बचावली. त्यांनी जळत्या कारच्या काचा फोडून कार पुढे लोटत नेल्याने अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांसह वकिलांची न्यायालयात येण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान कारच्या टायरचे स्फोट झाल्याने नागरिक जीव वाचविण्याच्या भीतीने सैरावैरा पळू लागले. उपस्थितांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.
अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात ‘बर्निंग कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:55 IST
जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगस्थळी सोमवारी ११.१५ च्या सुमारास एका कारला अचानक आग लागली.
अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात ‘बर्निंग कार’
ठळक मुद्देअनर्थ टळला