परतवाड्यात भर दुपारी सव्वा लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:57+5:302021-01-19T04:14:57+5:30

परतवाडा : स्थानिक किरणनगर येथे रविवारी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख २९ हजारांचा माल लंपास केला. ...

A burglary of Rs | परतवाड्यात भर दुपारी सव्वा लाखाची घरफोडी

परतवाड्यात भर दुपारी सव्वा लाखाची घरफोडी

Next

परतवाडा : स्थानिक किरणनगर येथे रविवारी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख २९ हजारांचा माल लंपास केला. ३० ग्रॅम सोने, घरातील बँकेचे सर्व पासबुक, दोन लाखांची मॅच्युअर होणारी पॉलिसी आदी चोरट्यांनी पळविली. रविवारी दुपारी दीड ते अडीच वाजताच्या सुमारास वनविभागातील सेवानिवृत्त अधिकारी ए.बी. भगत यांच्या घरी ही घरफोडीची घटना झाली. यावेळी भगत कुटुंबीय घराशेजारी जेवायला गेले होते. या घटनेची तक्रार भगत यांनी परतवाडा पोलिसांकडे दिली. तक्रारीच्या अनुषंगाने अज्ञात चोरट्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. अमरावतीहून ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याकरिता पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क केले आहे. आजूबाजूच्या घरांकडे लक्ष द्या, अनोळखी व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास त्याचे छायाचित्र काढून पोलिसांना माहिती द्या तसेच स्वतः दक्ष राहण्यास पोलिसांनी नागरिकांना बजावले आहे.

Web Title: A burglary of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.