शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे, वर्षभरात १५ ते १९ वयोगटात ३३८ प्रसूती

By उज्वल भालेकर | Updated: July 12, 2024 14:38 IST

Amravati : लैंगिक शिक्षणाची गरज; बालविवाह, अत्याचार पीडित महिलांचा समावेश

उज्वल भालेकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३६,८४३ महिलांची प्रसूती झाली आहे. या प्रसूतीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील जवळपास ३३८ महिलांची प्रसूती झाली असून, यातील अनेक मुली या कुमारी माता आहे. विविध लैंगिक अत्याचार तसेच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती आहे.

कोवळ्या वयात या मुलीवर मातृत्वाचे ओझे लादल्याचे चित्र आहे. बदलती जीवनशैली, समाजमाध्यमांचे तरुणाईवर असणारे गारूड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मेळघाट या अतिदुर्गम भागात आजही बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यातील अनेक बालविवाहाचे प्रकार हे प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती झाल्यावरच उघड होतात. त्यामुळे अनेकवेळा येथील कुमारी गर्भवती महिला ही प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्याचे टाळतात, लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून देखील काही मुली या कुमारी माता बनल्या आहेत. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील ३३८ मुलींची प्रसूती झाली आहे.

अत्याचार पीडित महिलेला कायदेशीर गर्भपाताचा अधिकार एखादी मुलगी ही लैंगिक अत्याचारातून जर गर्भवती राहिल्यास तिला गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. २४ आठवड्यांपर्यंत या पीडित महिलेला नको असलेल्या बाळाचा गर्भपात करता येतो.

रुग्णालय प्रशासनाने दिली पोलिसांना माहितीशासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे वय जर कमी असेल तर रुग्णालय प्रशासनाकडून सदर प्रकरणाची माहिती ही पोलिसांना दिली जाते. जिल्हा स्त्री रुग्णालयात अशा प्रकारच्या काही कुमारी माता प्रसूतीसाठी आल्याचे दिसून आले आहे. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भातील माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली.

मेळघाटात बालविवाहमेळघाट हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. आजही तेथील आदिवासी बांधव बालविवाहाच्या बंधनातून मुक्त झालेला नाही. या भागात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहेत. 

टॅग्स :AmravatiअमरावतीMelghatमेळघाट