शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:22 IST

ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते.

ठळक मुद्देचांदूर बाजारात लाखोंचा सेस : बाजार समितीच्या चुकीच्या धोरणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या विक्री दरम्यान रस्त्यावर उभे ठेवण्याची वेळ परप्रांतीय व्यापाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते. मुख्य बैलबाजार रविवारी भरत असला तरीही आठवडाभर बैलजोडीची खरेदी-विक्री होत असे. यामधून दरवर्षी सेसच्या रूपाने लाखो रुपयांचे उत्पन्न स्थानिक बाजार समितीला प्राप्त व्हायचे. यामुळे या बाजारात चांगल्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.बैलबाजारात खरीदी-विक्रीत गैरव्यवहार होत असल्याचे पोलिसांनी उघड केले होते. यात बाजार समितीच्या सर्व संचालकांना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे केवळ बाजाराच्या दिवशीच बैल बाजारात आणावे, असा ठराव घेत संचालकांनी परप्रांतीय बैलजोड्यांना आवाराबाहेर काढले. यामुळे जनावरांची तस्करी वाढली; त्यामुळे विके्रत्यांना व बाजार समितीला मोठा फटका बसला. बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पन्नातसुद्धा मोठी घट झाली आहे.बैलजोड्या रस्त्यावरबाजार समितीच्या तुघलकी धोरणामुळे या ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परप्रांतातून विक्रीसाठी आणल्या जाणाºया बैलजोड्या आज मुख्य रस्त्यावर बांधण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे. यामुळे अनेक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी या ऐतिहासिक बैलबाजाराकडे पाठ फिरवली आहे.अपघाताची शक्यताबाजार समितीपुढून जाणारा मार्ग हा मध्य प्रदेशात वाहतुकीसाठी अतिशय कमी अंतराचा असल्याने दिवस-रात्र वाहतूक सुरूच असते. रस्त्यावर लावण्यात येणाºया बैलजोड्यांमुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लाखोंची जोडी मिळण्याचे एकमेव स्थानराज्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून सुदृढ, देखण्या बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी चांदूर बाजार येथील बैलबाजारात आणले जात असत. राजस्थानातील नागोर, खिमसरा या भागातील सुप्रसिद्ध बैलजोड्यासुद्धा व्यापारी आणत होते. या जोडीची किंमत लाखोंच्या घरात असते. हे वैभव आता लयाला गेले असून, त्याकडे बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Marketबाजार