शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बुलबुल, सुगरण, शूबग अन् दयाळची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:03 IST

ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळद्या, मोर, तितर, सुगरण, पाणकावळा अशा बऱ्याच पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देपक्षी निरीक्षणाला प्रारंभ : विद्यापीठ परिसराची परिक्रमा; तलावावर आढळले वन्यप्राण्यांचे ठसे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळद्या, मोर, तितर, सुगरण, पाणकावळा अशा बऱ्याच पक्ष्यांची नोंद करण्यात आली.येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात पक्षिनिरीक्षण घेण्यात आले. यामध्ये पक्षिमित्रांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपासून पक्षिनिरीक्षणास सुरुवात करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण चावजी, प्रमोद मराठे, श्रीमती बापट, नूपुर बापट, मनीषा चावजी, प्रकाश कुळमेथे, विवेक वेखंडे, उदय मुळे, विजय संत, सुनंदा चावजी आदींनी पक्षिनिरीक्षणात सहभाग होता. विद्यापीठाची प्रशासकीय इमारत ते तलाव परिसरापर्यंत पक्षिनिरीक्षण पार पडले. यादरम्यान दुर्मीळ पक्ष्यांची माहिती संकलित करण्यात आली.पक्षिनिरीक्षणाची प्रक्रिया निरतंर सुरू असणार आहे. पक्ष्यांबद्दल आवड असलेल्यांनी पक्षिनिरीक्षणाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा, असे प्रवीण चावजी यांनी कळविले आहे.सोसायटीमार्फत दर आठवड्यात पक्षिनिरीक्षण होणार असून, पुढील टप्प्यात वेगळे स्थळ निश्चित केले जाणार आहे.वन्यप्राण्यांचा वावर बिबट्याचे दर्शन नाहीविद्यापीठ परिसरात असलेल्या तलावावर रानडुक्कर, हरिण या वन्यप्राण्यांंच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या तलाव परिसरात वन्यप्राण्यांचा वावर ही नित्याची बाब असल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र बिबट्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले नाही. काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाले नाही, असे सुरक्षा रक्षकांनी पक्षी निरीक्षकांच्या चमूला सांगितले.