शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

समाजमंदिर नव्हे, शौचालय बांधा

By admin | Updated: November 4, 2015 00:20 IST

स्थानिक वडाळी मातंगपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर समाजमंदिर बांधण्याचा घाट नगरसेवकांनी रचला आहे.

वडाळीतील महिलांची मागणी : विलास इंगोले यांनी सोडविला प्रश्नअमरावती : स्थानिक वडाळी मातंगपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर समाजमंदिर बांधण्याचा घाट नगरसेवकांनी रचला आहे. ही बाब परिसरातील महिलांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांचा लक्षात आणून दिली. त्यामुळे समाजमंदिर नव्हे, शौचालय बांधून द्या, अशी मागणी महिलांनी केली. दरम्यान स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांच्या पुढाकाराने ही समस्या क्षणात सोडविण्यात आली.वडाळी परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरात फार वर्षांपुर्वीचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र हे शौचालय जमिनदोस्त करुन त्या जागेवर समाजमंदिर निर्माण करण्याचा घाट नगरसेवक रचत असल्याची बाब महिलांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या लक्षात आणून दिली. शौचालय हटविल्या गेल्यास महिला, युवती व आबालवृद्धांना उघड्यावर शौचास जावे लागेल, असे महिलांनी सांगितले. शौचालय दुरुस्ती करण्याऐवजी तो पाडण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. समाजमंदिराच्या नावे मंजूर झालेला निधी शौचालय बांधण्यासाठी वापर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी वडाळी परिसरातील महिलांच्या समस्यांना तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. विलास इंगोले यांनी क्षणात आयुक्त गुडेवार यांच्याकडून शौचालय ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश करुन घेतले. परिणामी मागणी घेऊन आलेल्या महिलांचा तासभरात प्रश्न सुटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळक त होता, हे विशेष. माला खंडारे, मंगला खडसे, वंदना खडसे, मजाबाई खडसे, संगीता खडसे, पंचाबाई गवई, संगीता खडसे, ज्योती खडसे, वर्षा थोरात, सुनीता ठाकूर, मयुरी खडसे, सोनाली खडसे, शीला थोरात आदी महिलांनी शौचालय कायम ठेवण्याचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. (प्रतिनिधी)