शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

म्हशीची शिकार, वाघ परिसरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:04 IST

मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर ...

ठळक मुद्देकॅमेऱ्यात कैद : दोन दिवसांपासून मुक्काम; मंगरूळ दस्तगीरसह २२ गावे दहशतीखाली

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर (४५) यांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाने दुसऱ्या दिवशी म्हशीची शिकार केली़ वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे़ दरम्यान, दोन दिवसांपासून परिसरात या वाघाचा मुक्काम असून, अंजनसिंगी, कौंडण्यपूर भागातील २२ गावे अलर्ट करण्यात आली आहेत.अनेक गावे रात्रीला या नरभक्षक वाघाच्या दहशतीत आहे़ शनिवारच्या रात्रीला गावाच्या परिसरात शिरला असल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थ टेंभे घेऊन घराबाहेर पडले. झाडा, आष्टा, गिरोली, चिंचोली, येरली, सोनोरा काकडे, गोकुळसरा या गावातील लोकांनी रात्र जागूून काढली असली तरी एकाच ठिकाणी या वाघाचा मुक्काम असल्याचे स्पष्ट झाले आहे़मृत राजेंद्र निमकर यांना या ठिकाणी वाघाने ठार केले, त्या भागात वनविभागाच्यावतीने म्हैस खरेदी करून बांधण्यात आली होती़ रात्री १२ ते ३ च्या दरम्यान या नरभक्षक वाघाने म्हशीवर हल्ला चढविला. मानेवर हल्ला चढवून ही म्हैस त्याने फस्त केली. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. मोर्शी, वरूड, परतवाडा, अमरावती येथील ३१ बंदूकधारी कर्मचारी मागावर असली तरी प्रथमच मिळालेली माणसाची शिकार करीत दिघी खानापूर व नाकाडाच्या घनदाट जंगलात या वाघाने दोन दिवसांपासून मुक्काम ठोकला असल्याचे स्पष्ट झाले आहे़शेतात ओलीत करण्यासाठी विहिरीजवळील लाइट लावताना पाठीमागून या नरभक्षक वाघाने हल्ला चढविला. तब्बल १० मिनिटे राजेंद्र निमकर यांनी जीव वाचविण्यासाठी धडपड केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावर कपाशीची झाडे उखडली तसेच जमीन उकरण्याच्या अनेक खुणा वनविभागाने केलेल्या पंचनामा अहवालात नमूद आहेत.एखादा शेतकरी, शेतमजूर वाघाच्या हल्यात ठार झाल्यास पूर्वी आठ लाखांची नगदी मदत मिळत असे़ सन २०१५ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे दहा लाखांची मदत वनविभागाने जाहीर केली. केवळ दोन लाख रुपये रोख, तर आठ लाखांचा दहा वर्षांसाठी बॉण्ड केला जातो. किमान घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेणे महत्त्वाचे आहे़ दोन दिवसांपासून निमकर कुटुंबाला वनविभागाने मदत न दिल्याने असंतोष व्यक्त होत आहे़मंगरुळ दस्तगीर शिवारातील नरभक्षक वाघ ट्रॅप कॅमेºयात कैद झाला आहे. त्याचे परिसरातील जंगलातच वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग तातडीने उपाययोजना करीत आहे.- हरिश्चंद्र वाघमोडे, उपवनसंरक्षक, अमरावतीचिरोडी जंगलाकडे होणार प्रस्थान :२२ गावे अलर्टवरोरा जंगलातून देवळी, पुलगाव व थेट अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणारा हा नरभक्षक वाघ दररोज रात्रीच्या सुमारास १८ ते २० किलोमीटर प्रवास करीत असल्याची माहिती वनविभागाजवळ आहे़ मंगरूळ दस्तगीर येथे मानवाची शिकार मिळाल्याने या वाघाने मुक्काम ठोकला. आगामी दिवसांत नायगाव, वरूड बगाजी, अंजनसिंगी, कौंडण्यपूर, कुºहा, भिवापूर मार्गे चिरोडी, पोहरा जंगलात या वाघाचे प्रस्थान होण्याचे संकेत मिळाल्याने वनविभागाने २२ गावे अलर्र्ट केली असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर व वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली़पिंजऱ्याची परवानगी मिळणार कधी?नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तथा पिंजऱ्यात अडकविण्याकरिता नागपूरच्या प्रधान मुख्य वाघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची असते़ अमरावतीचे उपवनसरंक्षक हरिचंद्र वाघमोडे यांनी शनिवारी यासंदर्भात पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक एक़े. मिश्रा यांंना पाठविण्यात आले. सदर नरभक्षक वाघ एकाच ठिकाणी दोन दिवस मुक्कामी असताना अद्यापही पिंजºयाची परवानगी मिळाली नाही़

टॅग्स :Tigerवाघ