शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात बीएसएनएल 'नॉट रिचेबल'; शासकीय स्किम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:07 IST

राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे.राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) यांनी प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या बीएसएनएल सीमकार्ड, मोबाईलबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राज्यात ६०० वनक्षेत्रपाल, २२०० वनपाल आणि ९ हजार वनरक्षकांना बीएसएनएलचे मोबाईल, सीमकार्ड देण्यात आले. त्याकरिता वनविभागाने सुमारे २० कोटी रूपये खर्च केला. वनविभागाने कम्युनिकेशनसाठी ही स्किम सन २०१७ पासून सुरू केली होती, हे विशेष.

वनविभागाचे बीएसएनएलला प्राधान्यबीएसएनएल ही कंपनी शासकीय असल्यामुळे वनविभागाने कम्युनिकेशनसाठी त्याला प्राधान्य दिले. बीएसएनएलकडून वनकर्मचा-यांना हजारो सीमकार्ड वाटप करण्यात आले. ही स्किम सुरू ठेवण्यासाठी वनविभाग प्रत्येक कर्मचा-यांचे दरमहा १७० रूपये बिल देते. परंतु, वनकर्मचा-यांना हे सीमकार्ड २४ तास सुरू ठेवण्याची अट असल्याने त्यांची ‘प्रायव्हेसी’ संपुष्टात आली आहे. त्यामुळे काही वनकर्मचा-यांनी मोबाईलमधून सीमकार्ड बाहेर काढले. काहींनी फेकून दिल्याची माहिती आहे. असे असले तरी  बीएसएनएलच्या सीमकार्ड वापराचे भुर्दंड सुरूच आहे. दरम्यान, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) यांनी वनकर्मचा-यांकडून दरमहा १७० रुपये सीमकार्डचे वसूल करण्याचे आदेश दिले आहे. परिणामी बंद पडलेल्या सीमकार्डची माहिती आता देणे सुरू झाली आहे. 

जंगल क्षेत्रात कव्हरेज मिळेनावनकर्मचारी, अधिका-यांसाठी प्रशासकीय, शासकीय कामानिमित्त बीएसएनएल सेवा दिली असली तरी जंगल क्षेत्रात कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएल सीमकार्ड कधी नॉटरिचेबल, कव्हरेज क्षेत्राबाहेर, असा संवाद ऐकू येतो. त्यामुळे वनकर्मचा-यांसाठी बीएसएनएल सेवा कुचकामी ठरू लागली आहे. सीमकार्ड वापराचे बिल सातत्याने दिले जात आहे.     ''तीन कर्मचा-यांनी बीएसएनएलचे सीमकार्ड बंद केल्याची माहिती पुढे आली. आणखी किती कर्मचा-यांनी सीमकार्ड बंद केले, याची शहानिशा केली जात आहे. विनाकारण बिल दिले जाऊ नये, हे यामागील उद्देश आहे.''- प्रवीण चव्हाण,मुख्य वनसंरक्षक, अमरावती (प्रादेशिक)

टॅग्स :BSNLबीएसएनएलforestजंगलforest departmentवनविभाग